Shakib Al Hasan News sakal
क्रीडा

Shakib Al Hasan Video : राडा तर होणारच...! निवडणूक जिंकल्यानंतर कर्णधारने चाहत्याच्या मारली कानाखाली

Shakib Al Hasan News |

Kiran Mahanavar

Shakib Al Hasan : बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसन पुन्हा एकदा वादात सापडला आहे. शाकिबने नुकतीच बांगलादेशातील निवडणूक जिंकली आहे आणि पहिल्यांदाच देशाच्या संसदेत स्थान मिळवले आहे.

मात्र, यासोबतच तो वादात सापडला आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्याला कानाखाली मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ मतदानाच्या वेळचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

मैदानावरील शाकिब अल हसनचा स्वभाव सर्वांना माहित आहे. अनेकवेळा तो खेळाडू आणि पंचांशी वाद घालताना दिसला आहे. यामुळे त्याला अनेकवेळा दंड ठोठावण्यात आला आहे. एकदा अंपायरच्या निर्णयावर नाराज होऊन त्याने स्टंपला लाथ मारली आणि त्याच्यावरही बंदी घालण्यात आली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाकिबला मोठ्या संख्येने लोकांनी वेढलेले दिसत आहे. यादरम्यान तो चाहत्याच्या कानाखाली मारली. मात्र, ही घटना कधी आणि कुठे घडली हे स्पष्ट झाले नसून, निवडणूक निकाल जाहीर होण्याच्या एक आठवडा आधी हा वाद झाला असावा, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

असा दावा करण्यात आला आहे की, व्हिडिओमध्ये शाकिबने एका मतदान केंद्रावरील घटनेदरम्यान चाहत्याला थप्पड मारली होती. मतदान करण्यासाठी तो पोहोचताच त्याला चाहत्यांनी घेरले आणि एका चाहत्याने त्याला मागून पकडण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी शाकिबने चाहत्याला कानशिलात मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT