Shane Warne Death Corona Vaccine
Shane Warne Death Corona Vaccine esakal
क्रीडा

Shane Warne Death : डॉक्टरांचा दावा; शेन वॉर्नचा मृत्यू कोरोना लसीमुळे?

अनिरुद्ध संकपाळ

Shane Warne Death Corona Vaccine : ऑस्ट्रेलियाचा महान माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे मार्च 2022 मध्ये निधन झाले होते. मात्र त्याच्या निधनाची चर्चा आजही होते. शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेला होता. मत्र त्याचा व्हिलाच्या रूममध्ये मृतदेह आढळून आला होता. वॉर्नच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे जगभरात याची चर्चा झाली होती. वॉर्नचा मृत्यू हा ह्रदय विकाराच्या झटक्यामुळे झाला होता.

मात्र आता शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत एक रिपोर्ट समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये शेन वॉर्नचा मृत्यू हा कोरोना लसीमुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. डॉक्टरांनी दावा केलाय की वॉर्नच्या मृत्यूचे कारण हे कोरोना लस असू शकते.

ही लस कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आली होती. या लसीमुळे ह्रदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. शेन वॉर्नचा मृत्यू हा ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला होता. शेन वॉर्नने मृत्यूपूर्वी 9 महिने आधी कोरोना लस घेतली होती.

वॉर्नने mRNA कोरोना प्रतिबंधीत लस घेतली होती.

शेन वॉर्नने mRNA ही लस घेतली होती. अहवालानुसार या लसीमुळे ह्रदयासंबंधीच्या विकारात वाढ होते असा दावा करण्यात येतोय. ऑस्ट्रेलियाचे आणि ब्रिटीश ह्रदयरोग तज्ज्ञ यांच्या मते ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा मृत्यू देखील याच कारणामुळे झाला आहे असा दावा केला.

याशिवाय कार्डियोलॉजिस्ट क्रिस नील आणि डॉक्टर असीम मल्होत्रा यांच्या मते वॉर्नने जी लस घेतली होती त्या लसीमुळे ह्रदयाच्या धमण्यांचा रोग वेगाने वाढू शकतो.

शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 145 कसोटी आणि 194 वनडे सामने खेळले होते. त्याने कसोटीत 708 तर वनडे मध्ये 293 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय आयपीएलमध्ये देखील त्याने 55 सामन्यात 57 विकेट्स घेतल्या होत्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT