Shane Warne Death  esakal
क्रीडा

शेन वॉर्नच्या व्हिलामध्ये थायलंड पोलिसांना आढळून आले रक्ताचे डाग

सकाळ डिजिटल टीम

शेन वॉर्नचा (Shane Warne) थायलंडमधील व्हिलामध्ये झालेल्या मृत्यू बाबत थायलंड पोलिसांनी (Thailand Police) आज मोठा खुलसा केला आहे. थायलंड पोलिसांना व्हिलामध्ये तसेच टॉवेलवर रक्ताचे डाग (Blood Stain) आढळून आले आहे. शेन वॉर्न थायलंडमधील व्हिलामध्ये आपली सुट्टी एंजॉय करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा तेथे मृत्यू झाला.

शेन वॉर्नला शुक्रवारी थायलंड आंतरराष्ट्रीय रूग्णालयातील डॉक्टरांनी मृत (Shane Warne Death) घोषित केले होते. यापूर्वी त्याच्या मित्रांनी देखील शेन वॉर्नला व्हिलामध्येच वाचवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आता स्काय न्यूज थायलंडच्या माध्यमांचा हवाला देऊन सांगितले की थायलंडच्या पोलिसांना व्हिलामधील फरशीवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. तसेच शेन वॉर्न थांबलेल्या रूममधील टॉवेलवर देखील रक्ताचे डाग आढळून आले आहे.

थाई पोलिस दलातील स्थानिक कमांडर सॅटिट पोलपनिनिट यांनी थाई माध्यमांना सांगितले की शेन वॉर्नच्या रूममध्ये मोठ्या प्रमाणावर रक्ताचे डाग दिसून आले आहेत. ज्यावेळी सीपीआर (CPR) उपचार सुरू करण्यात आले होते त्यावेळी वॉर्नच्या तोंडातून द्रव्य पदार्थ बाहेर पडला त्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. कोह सामुई पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी युत्ताना सिरिसोम्बा यांच्यानुसार ह्रदयाच्या तक्रारीबाबत वॉर्नने नुकतेच डॉक्टरांशी संपर्क केला होता. त्यामुळे त्याचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची शक्यता नाही.

शेन वॉर्न आपल्या मित्रांसोबत थायलंडमधील प्रसिद्ध कोह सामुई बेटावर सुट्टी घालवण्यासाठी आला होता. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वॉर्नच्या एका मित्राला तो संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. दरम्यान, रूग्णवाहिका येईपर्यंत मित्रांनी सीपीआर उपचार सुरू केले होते. त्यानंतर शेन वॉर्नच्या मॅनेजरने त्याचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य प्रसिद्ध केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT