Shane Warne Female Fan Maid Tattoo on on her thighs
Shane Warne Female Fan Maid Tattoo on on her thighs esakal
क्रीडा

शेन वॉर्नच्या महिला फॅनने मांडीवर काढला वॉर्नीचा टॅटू

सकाळ डिजिटल टीम

शेन वॉर्नला (Shane Warne) नुकतेच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर जगभरातील नामवंत व्यक्तींनी श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, शेन वॉर्नची फॅन केली कार्टर बेलने (Kellie Carter-Bell) या महान लेग स्पिनरचा टॅटू (Tattoo) आपल्या मांडीवर काढून अनोखी श्रद्धांजली वाहिली. शेन वॉर्नने तिला एका चुकीच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित केले होते. त्यामुळे केलीने आपल्या उजव्या मांडीवर गेल्या आठवड्यात शेन वॉर्नचा टॅटू काढून घेतला. हा टॅटू तिने आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) झालेल्या स्टेट मेमोरियल सर्व्हिस (State Memorial Service) कार्यक्रमात प्रवेश करताना दाखवला.

केली कार्टर बेल मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमधील शेन वॉर्नच्या पुतळ्याशेजारी उभी राहिली आणि तिने सर्वांना सांगितले की शेन वॉर्नने तिला कौटुंबिक हिंसाचाराने व्यापलेल्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी ताकद आणि धैऱ्य दिले होते. ती जवळपास दोन दशके कौटुंबिक हिंसाचाराची शिकार होत होती.

केली म्हणाली, 'मी जवळपास 23 वर्षे कौटुंबिक हिंसाचारीची बळी पडले होते. शेन वॉर्नने मला स्वतःवर प्रेम करण्यास शिकवले. मी त्याच्यासोबत याबाबत बोलत होते तेव्हापासून आम्ही दोघे मित्र होतो. त्याची जादू त्याची बुद्धीमत्ता फक्त क्रिकेट खेळण्यापुरतीच मर्यादित नव्हती.'

केली ही पाच मुलांची आजी आहे. ती पुढे म्हणाले की, 'शेन वॉर्नने मला माझ्यावर प्रेम करण्यास शिकवले. त्याच्याकडून मी प्रेरणा घेऊन 10 जणांच्या आयुष्टात बदल घडवू शकले.' शेन वॉर्नच्या स्टेट मेमोरियल सर्व्हिस कार्यक्रमाला जवळपास 50000 लोक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर आले होते. यावेळी शेन वॉर्नचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT