VIDEO : आकाश दीपच्या भन्नाट माऱ्यावर डेव्हिड विलीचा स्लाईडिंग कॅच

IPL 2022 RCB David Willey sliding Catch
IPL 2022 RCB David Willey sliding Catchesakal

मुंबई : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) जरी आयपीएल (IPL 2022) हंगामाची सुरुवात पराभवाने केली. आरसीबीने आपला पहिलाच सामना 205 धावा करूनही गमावल्याने गोलंदाजी ही दुखरी नस अजून बरी झाली नसल्याची चर्चा होती. मात्र आजच्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी भन्नाट मारा करत केकेआरची डी. वाय. पाटीलच्या मैदानावर त्रेधातिरपट उडवून दिली. या माऱ्याला आरसीबीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट फिल्डिंग करून चांगली साथ दिली.

IPL 2022 RCB David Willey sliding Catch
VIDEO : 'दहा रूपयाची पेप्सी युजी भाई सेक्सी'

सध्या असाच आरसीबीच्या डेव्हिड विलीने (David Willey) घेतलेल्या चांगल्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाश दीप (Akash Deep) पॉवर प्लेचे शेवटचे षटक टाकत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर केकेआरच्या नितिश राणाने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाश दीपच्या बाऊन्सरवर मारलेल्या पूल शॉटवर राणाला नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे चेंडू वर उडाला. दरम्यान, शॉर्ट फाईन लेगला असलेल्या डेव्हिड विलीने मागे धावत हा कॅच पकडला. कॅच पकडताना विलीने स्लाईड मारली.

IPL 2022 RCB David Willey sliding Catch
आयपीएलमध्ये माझ्यावर सहज 15 कोटींची बोली लागली असती : रवी शास्त्री

दरम्यान, आरसीबीने केकेआरचा डाव 128 धावात संपुष्टात आणला. आरसीबीकडून वानिंदू हसरंगाने 4 षटकात 20 धावा देत 4 विकेट मिळवल्या तर आकाश दीपने 45 धावा देत 3 बळी टिपले. त्याला हर्षल पटेलने 2 विकेट घेत चांगली साथ दिली. मात्र केकेआरने देखील आरसीबीला पॉवर प्लेमध्ये तीन धक्के दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com