shane warne  Sakal
क्रीडा

शेन वॉर्नचा विचित्र डाएट प्लॅन; मॅनेजरनं शेअर केली गोष्ट

सुशांत जाधव

सिडनी : क्रिकेट जगतातील महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू सुट्टीवर जाण्याआधी दोन आठवडे विशेष डाएट प्लॅन फॉलो करत होता. छातीत दुखत असल्याची तक्रारही त्याने केली होती, असा खुलासा त्याच्या मॅनेजरने केला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर (Australian Cricketer) थायलंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. त्याचा मृत्यू हा ह्रदय विकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वॉर्नचा मॅनेजर एर्सकिने याने ‘नाइन नेटवर्क'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेन वॉर्नच्या डाएटची गोष्ट शेअर केलीये. त्याने काहीतरी विचित्र डाएट प्लॅन आखला होता, असे ते म्हणाले. काही दिवसांपासून शेन वॉर्नच्या आहारात केवळ पाणी आणि इतर द्रव पदार्थाचा समावेश असायचा. याआधी तीन चार वेळा त्याने असा डाएट प्लॅन केल्याचे पाहिले होते, असेही त्यांनी सांगितले.

द्रव्य पदार्थामध्ये तो काळ्या आणि हिरव्या ज्यूससह तो कधीतरी मस्का पाव किंवा मस्का ऐवजी पावामध्ये लसून भरून त्याचे सेवन करायचा. सिगारेटही त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग होती. त्यामुळे त्याला ह्रदयविकाराचा झटका आला असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. वॉर्नच्या कुटुंबियांनी थायलंड पोलिसांना दिेलेल्या माहितीनुसार, त्याला ह्रदयविकारासंबंधीत त्रास तसेच दमाही होता.

मृत्यूपूर्वी वॉर्नने एक इन्स्टा पोस्ट शेअर केली होती. जुने फोटो शेअर करत त्याने वजन कमी करत असल्याचे म्हटले होते. जुलैपर्यंत सडपातळ होण्याचा प्लॅन आहे, असा उल्लेखही त्याने या पोस्टमध्ये केला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT