Shane Warne would receive a state funeral says Australia Prime Minister Scott Morrison  ESAKAL
क्रीडा

शेन वॉर्नच्या निधनाचे वृत्त ऐकून पंतप्रधान भांबावले

सकाळ डिजिटल टीम

सिडनी: शेन वॉर्नच्या अचानक झालेल्या निधनावर (Shane Warne Death) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Minister Scott) यांनी आपण भांबावलो असल्याची प्रतिक्रिया दिली. याचबरोबर त्यांनी शेन वॉर्न हा देशासाठी एक महान व्यक्तीमत्व होता त्यामुळे त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (State Funeral) होणार असल्याचे जाहीर केले.

शेन वॉर्न (Shane Warne) हा देशातील खेळाडूंसाठी एक आदर्श होता. त्याचे व्यक्तीमत्व हे 'लार्जर दॅन लाईफ' असे होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन ट्विट्सची मालिका करत दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, 'त्याचा विनोदी स्वभाव, त्याची पॅशन, कायम उपलब्ध असणे यामुळे त्याला सर्वांचे प्रेम मिळत राहिले. देशासाठी शेन वॉर्नने केलेल्या कामगिरीबद्दल आम्ही त्याच्या कुटुंबियांना त्याचे शायकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली आहे. हा निर्णय त्याच्या कुटुंबियांशी चर्चा करून घेतला जाईल.'

स्कॉट मॉरिसन यांनी शेन वॉर्नची तुलना ग्रेट डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, 'शेन वॉर्नसारखा खेळाडू होणे नाही. त्याने त्याचे आयुष्य त्याच्या पद्धतीने जगले. त्याने दैदिप्यमान कामगिरी केली. मात्र त्याला त्याने केलेल्या चुकांची खंतही होती. तो ही खंत घेऊनच तो आपल्या चेहऱ्यावर हास्य घेऊन आयुष्याचा सार घेऊन जगला. त्याची गोलंदाजीची शैली, प्रेक्षकांशी असलेलं नातं तो एकमेवाद्वितिय होता.'

मॉरिसन पुढे म्हणाले की, 'त्याने अनेक मुलींना आणि मुलांना क्रिकेटकडे वळण्यास प्रेरित केले. त्याने क्रिकेट सोपं असल्याचं भासवलं. एक वेळ अशी होती की ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक घराच्या अंगणात सर्वांनी शेन वॉर्नचा तो फ्लिपर ट्राय केला होता. आमचे प्रेम आणि सहवेदना शेन वॉर्नच्या कुटुंबियांसोबतविशेष करून शेन वॉर्नची मुलं ब्रुकी, जॅक्सन आणि समर यांच्यासोबत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT