Sharad Pawar Statement On WFI  esakal
क्रीडा

Sharad Pawar : निर्णय घेण्यास उशीर केला... WFI च्या निलंबनानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

शरद पवारांनी क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयावर दिली प्रतिक्रिया

अनिरुद्ध संकपाळ

Sharad Pawar Statement On WFI : भारतीय कुस्ती परिषदेच्या निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना क्रीडा मंत्रालयाने निलंबित केलं आहे. यानंतर क्रीडा जगतात यावरून समिश्र प्रतिक्रिया आल्या. दरम्यान, अनेक वर्ष महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेण्यास उशी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातील भीमथडीचे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी राजकारणाबरोबरच भारतीय कुस्ती परिषदेच्या संदर्भात घडलेल्या घडामोडींवर देखील शरद पवार यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, 'क्रीडा मंत्रालायने भारतीय कुस्ती परिषदेची नवी बॉडी निलंबित करण्यास उशीर केला. त्यांनी यापूर्वीच हे करायला हवे होते. ज्या महिला खेळाडूंनी भारताचा सन्मान वाढवला. त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता.

देशाकडून खेळताना कर्तृत्व गाजवणाऱ्या महिला खेळाडूंसोबतची वागणूक योग्य नव्हती. यापूर्वीच भारतीय कुस्ती परिषदेच्या सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता.'

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्ती असलेल्या संजय सिंह यांची भारतीय कुस्ती परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर नव्या मंडळाने 15 आणि 20 वर्षाखालील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची घाई गडबडीत घोषणा केली.

यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवीन मंडळाने घाई गडबडीत निर्णय घेतल्याचे कारण देत अध्यक्षांसह संपूर्ण मंडळच निलंबित केलं. मात्र या मागचं खरं कारण हे ब्रिजभूषण यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्ती सोडली तर बजरंगने पद्मश्री पीएमओच्या बाहेरील पदपथावर ठेवला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT