Sharath Kamal Achanta 
क्रीडा

CWG 2022 : टेबल टेनिसमध्ये सुवर्ण चौकार; 40 वर्षाच्या शरथची दमदार कामगिरी

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकात आणखी भर पडली आहे.

Kiran Mahanavar

Sharath Kamal Achanta Table Tennis CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकात आणखी भर पडली आहे. टेबल टेनिसपटू शरथ कमलने पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत शरथ कमलने इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा 11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-8 असा पराभव केला.

राऊंड ऑफ 32 मध्ये शरथने ऑस्ट्रेलियाच्या फिन लूचा 4-0 असा पराभव केला. त्याचवेळी, 16 च्या फेरीत शरथ कमलने नायजेरियाच्या ओलाजिदे ओमोटोयोवर 4-2 असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडूने सिंगापूरच्या इसाक क्वेक योंगचा 4-0 असा पराभव केला. त्याचवेळी, उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहलचा 4-2 असा पराभव केला.

शरथच्या सामन्यापूर्वी साथियान गनसेकरननं इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉला 4-3 च्या फरकाने मात देत कांस्य पदक पटकावले. साथियान आणि पॉल यांच्यातील हा कांस्यपदकासाठीचा सामना चांगलाच अटीतटीचा होता. पण अखेरच्या राऊंडमध्ये साथियानने आक्रम खेळ दाखवत अगदी रोमहर्षकपणे (11-9 11-3 11-5 8-11 9-11 10-12 11-9) अशा फरकाने विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT