Shardul Thakur Wedding esakal
क्रीडा

Shardul Thakur Wedding : बॉलिंग टाकतो क्विक, रन देखील धावली क्विक... म्हणत लॉर्ड शार्दुलने घेतला ढासू उखाणा

अनिरुद्ध संकपाळ

Shardul Thakur Wedding : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर हा नुकताच आपली गर्लफ्रेंड मिताली परूळकरशी विवाह बंधनात अडकला. त्याने कर्जत येथील फार्म हाऊसवर आपल्या काही निवडक मित्र आणि कुटुंबीयांसोबत पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. शार्दुलच्या हळदीपासून सात फेऱ्यांपर्यंतच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

आता शार्दुल ठाकूरचा मराठीतून घेतलाला फर्मास उखाणा देखील व्हायरल होत आहे. शार्दुल ठाकूरने घिटापिटा उखाणा न घेता मितालीसाठी खास आपल्या शैलीत उखाणा तयार केला. शार्दुल उखाणा घेताना म्हणतो की 'बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावली क्विक.. मिताली आमची सुंदरतेचं प्रतिक!'शार्दुलचा हा क्रिकेटिंग उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शार्दुल आणि मिताली एकमेकांना आधीपासूनच ओळखतात, त्यांच्यात मैत्रीनंतर प्रेम निर्माण झालं आणि आज अखेर ते लग्नबंधनात अडकले. 31 वर्षीय शार्दुलचा संगीत आणि हळदी समारंभही मोठ्या उत्साहात पार पडला होता. यामध्ये रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी देखील हजेरी लावली होती.

शार्दुल आणि मिताली यांनी २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये मुंबईत एका खासगी कार्यक्रमात साखरपुडा केला होता. साखरपुड्याचं ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनोरंजन केंद्र होतं. शार्दुलनं २०१७ मधये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. भारतासाठी त्यानं ८ कसोटी, ३४ वनडे आणि २५ टीट्वेंटी सामने खेळले आहेत. तसेच ९९ विकेटही त्यानं घेतल्या आहेत. तर ६२१ रन्स बनवले आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT