shashi tharoor comments on suryakumar yadav poor form and question exclusion of sanju samson from the team india cricket news in marathi  sakal
क्रीडा

Team India News: संजूने अजून काय करावं? सूर्याच्या 'गोल्डन डक'नंतर शशी थरूर BCCI वर भडकले

सकाळ ऑनलाईन टीम

Shashi Tharoor on Suryakumar Yadav : टी-20 मध्ये जगातील नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हती. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सूर्या सतत फ्लॉप ठरला.

तिन्ही सामन्यांत तो खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. आता त्याच्या खराब कामगिरीवर आणि तीनदा गोल्डन डकवर काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते शशी थरूर यांनी ट्विट करून टीम इंडियावर निशाणा साधला आहे.

प्रतिभावान खेळाडू संजू सॅमसनला किती दिवस संघाबाहेर ठेवणार असा प्रश्न उपस्थित केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 21 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आणि मालिका गमवावी लागली.

इतकंच नाही तर आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावरून टीम इंडियाची घसरण झाली.(Latest Marathi News)

शशी थरूर यांनी सूर्यकुमार यादवच्या माध्यमातून टीम इंडियाच्या निवड समितीवर निशाणा साधला आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'बिचारा सूर्यकुमार यादवने सलग तीन गोल्डन डकसह अविश्वसनीय विश्वविक्रम केला आहे, परंतु आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये 66 च्या सरासरीने फलंदाजी करणारा संजू सॅमसन 6व्या क्रमांकावर आहे. असे असूनही तो संघात नाही, त्याला आणखी काय हवे?(Marathi Tajya Batmya)

IPL 2023 31 मार्चपासून सुरू होत आहे. या वर्षीही संजू सॅमसन पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. संजू सॅमसनसाठी हा सीझन फलंदाज म्हणून खूप महत्त्वाचा असणार आहे.

कारण टीम इंडियाच्या मधल्या फळीत छाप पाडण्यासाठी संजूला आयपीएलच्या 16व्या हंगामात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT