radha yadav 
क्रीडा

शफालीसोबतच राधालाही लागली लॉटरी!

बिग बॅश लीगच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय.

सुशांत जाधव

भारताची स्फोटक बॅटर शफाली वर्मा (Shefali Varma) आणि डावखुरी फिरकीपटू राधा यादव (Radha Yadav) ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग (WBBL) च्या मैदानात उतरणार आहेत. दोन वेळा चॅम्पियन राहिलेल्या सिडनी सिक्सर्सकडून या दोघी खेळणार आहेत.

13 मे रोजीच या दोघींसोबत सिडनी सिक्सर्स संघाने करार केल्याचे वृत्त समोर आले होते. पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या सातव्या हंगामापूर्वी बिग बॅग लीगने अधिकृतरित्या यासंदर्भातील घोषणा केली आहे. सिडनी सिक्सर्स 14 आक्टोबर रोजी मेलबर्न स्टार्स विरुद्ध होबार्टच्या डस्टोन एरिना स्टेडियमवरुन स्पर्धेला सुरुवात करेल. बिग बॅश लीगच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय. सिडनीसाठी यंदाची स्पर्धा खास असेल. या संघात भारतीय महिला संघातील दोन प्रतिभावंत खेळाडूंचा समावेश आहे. शफली वर्मा आणि राधा यादव यांच्यामुळे टीम अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

17 वर्षीय शफाली वर्माने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले होते. भारताकडून सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला आहे. सध्याच्या घडीला आयसीसी महिला टी 20 क्रमवारीत शफाली अव्वलस्थानी आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यात शफालीने आपल्या खेळीतील धमाका दाखवून दिला होता.

क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’च्या वृत्तानुसार, शफाली बिग बॅश लीगमध्ये खेळण्यास उत्साहित आहे. ही एक माझ्यासाठी मोठी संधी असून त्याचा पूरपूर फायदा उचलण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, असे शपालीने म्हटले आहे. शफाली वर्मा सिक्सर्सकडून खेळताना एलिसा हीली, एलिसे पेरी आणि एश्ले गार्डनर या बॅटर्ससोबत खेळताना दिसेल.

शफालीसोबत राधा यादव देखील ऑस्ट्रेलियन लीगमध्ये खेळताना दिसेल. 2018 टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत राधा यादवने सर्वाधिक विकट घेतल्या होत्या. संयुक्तरित्या ती अव्वस्थानी राहिली होती. 21 वर्षीय फिरकीपटू आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये 11 व्या स्थानावर आहे. बिग बॅश लीगमध्ये भारताचा ठसा उमटवण्यास आतूर असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT