BAN vs IND 2nd ODI Shikhar Dhawan esakal
क्रीडा

Shikhar Dhawan VIDEO : ही तर सामान्य गोष्ट... पहिल्या सामन्यातील पराभवावर गब्बरची प्रतिक्रिया

अनिरुद्ध संकपाळ

BAN vs IND 2nd ODI Shikhar Dhawan Addresses The Press : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा वनडे सामना उद्या (दि. 07) ढाकाच्या शेरे बांगला स्टेडियमवर होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने एका विकेटने गमावला असल्याने आता मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू शिखर धवन पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याने संघ सध्या कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतोय याची माहिती दिली. याचबरोबर पहिल्या सामन्यातील पराभवाबाबत त्याचे मत देखील त्याने व्यक्त केले.

शिखर धवन पत्रकार परिषदेत म्हणाला की, 'आम्ही दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहोत आम्हाला विश्वास आहे की आम्हीच विजयी होणार. आम्ही काही पहिल्यांदाच मालिकेतील पहिला सामना हरलेलो नाही. ही तर सामन्य गोष्ट आहे. आम्हाला या परिस्थितीतून कसे बाऊन्स बॅक करायचे हे माहिती आहे. नक्कीच बांगलादेश चांगलं क्रिकेट खेळत आहे.'

शिखर बागंलादेशच्या संघाबद्दल देखील बोलला. तो म्हणाला की, 'पहिला सामना हा खूप रोमांचकारी झाली. हा एक लो स्कोरिंग सामना होता. बांगलादेशने शेवटच्या क्षणी सामना आमच्याकडून हिसकावून घेतला. ही गोष्ट नेहमी होत नाही. नक्कीच त्यांनी चांगला खेळ केला. विजयचे श्रेय त्यांना जातेच. आम्ही आमच्या चुकांबाबत टीम मिटिंगमध्ये चर्चा केली असून आम्ही आमच्या चुका टाळून येणाऱ्या सामन्यात नक्कीच प्रभाव पाडू.'

भारताने पहिल्या वनडे सामन्यात 186 धावा केल्या होत्या. त्यात केएल राहुलने 73 धावांचे योगदान दिले होते. भारताने कमी टार्गेटमध्ये देखील दमदार गोलंदाजी करत बांगलादेशची अवस्था 9 बाद 136 धावा अशी केली होती. मात्र मेहदी हसन मिराझने नाबाद 38 धावांची खेळी करत 10 विकेटसाठी मुस्तफिजूर रहीमबरोबर नाबाद 51 धावांची भागीदारी रचत भारताला विजयापासून वंचित ठेवले होते.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT