Shikhar Dhawan Asian Games 2023 
क्रीडा

Team India : टीम इंडियाची घोषणा अन् दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपली? ब संघातही मिळाले नाही स्थान

Kiran Mahanavar

Asian Games Shikhar Dhawan : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यानंतर आयर्लंड मालिका, आशिया चषक, ऑस्ट्रेलिया मालिका आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 खेळला जाणार आहे. दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना विश्वचषकात खेळणे अशक्य आहे. विश्वचषकासाठी संघ अद्याप जाहीर झालेला नाही, मात्र त्याआधी होणाऱ्या मालिकेसाठी संघ निवडीतील काही खेळाडूंच्या नावांबाबत अटकळ आहे. सर्वात मोठे नाव जे चर्चेचा विषय आहे ते शिखर धवनचे. धवन सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या संघाचा भाग नाही, तर त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ब संघात स्थान मिळालेले नाही.

यानंतर शिखर धवनची कारकीर्द आता संपली की काय, असा मोठा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांत धवन टी-20 संघाचा भाग नाही पण जेव्हा-जेव्हा ब संघाची घोषणा होते, तेव्हा त्याच्याकडे एकदिवसीय किंवा टी-20ची कमान सोपवण्यात आली होती. पण आता कदाचित मंडळाने पुढे जाण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघाची कमान ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.

या संघात एकही वरिष्ठ खेळाडू नसून सर्व युवा खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी, भारताला पुन्हा टी-20 विश्वचषक खेळायचा आहे, त्या दृष्टीनेही ही तरुणांसाठी चांगली कसोटी ठरू शकते. रिंकू सिंग, टिळक वर्मा सारख्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे त्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी आहे. पण धवनची अनुपस्थिती आता त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

शिखर धवन सध्या टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या संघातून बाहेर आहे. सप्टेंबर 2018 पासून तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याच वेळी डिसेंबर 2022 पासून तो एकदिवसीय संघातूनही बाहेर आहे. जुलै 2021 मध्ये तो शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय खेळताना दिसला होता. आता या वर्षी विश्वचषक होणार असताना त्याला भारताच्या ब संघातही स्थान मिळालेले नाही. सध्या टीम इंडियाच्या संघाबाहेर असण्याचा आणि धवनचा मध्यंतर पाहिला तर, धवनची कारकीर्द आता संपली आहे असे दिसते.

शिखर धवनने भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 2315 धावा आहेत ज्यात 7 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6793 आणि टी-20मध्ये 1759 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवनने 17 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या नावावर 11 अर्धशतके आहेत. शिखर धवन 2019 मध्ये टीम इंडियाच्या विश्वचषक संघाचा एक भाग होता आणि त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धही शतक झळकावले पण त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेर पडला. याशिवाय तो 2015 विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही एक भाग होता. पण आता गब्बर या नावाने ओळखला जाणारा हा दिग्गज खेळाडू टीम इंडियात पुनरागमन करू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Miss Universe 2025 : ज्युरीचं स्पर्धक मॉडेलशी अफेअर, जजने फायनलच्या ३ दिवस आधी दिला राजीनामा; सगळं आधीच ठरल्याचा आरोप

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

RTO Scam:'आरटीओच्या जाहिरातीतून फसवणुकीचा नवा फंडा; १९९९ रुपयात वाहन न चालवताच परवाना देण्याचे अमिष, काय आहे वास्तव..

Latest Marathi Breaking News Live Update : "कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपचाच"- नरेंद्र पवार

SCROLL FOR NEXT