Shikhar Dhawan esakal
क्रीडा

Shikhar Dhawan: मयंक अग्रवालचा पत्ता कट?

सकाळ डिजिटल टीम

सध्या क्रिकेट जगतात इंडियन प्रीमियर लीग 2023 ची चर्चा रंगली आहे. दरम्यान, पंजाब किंग्जने टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळखला जाणाऱ्या शिखर धवनवर मोठी जबाबदारी दिली आहे. शिखर धवन पंजाब किंग्जचे नेतृत्व करणार आहे. तो आता मयंक अग्रवालच्या जागी संघाचे नेतृत्व करेल. असे सांगण्यात येत आहे. मात्र फ्रँचायझीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. (Shikhar Dhawan to replace Mayank Agarwal as Punjab Kings captain from IPL 2023 )

पंजाब किंग्ज फ्रँचायझी बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रँचायझीने आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वीच संघाची कमान मयंक अग्रवालकडे सोपवली होती, मात्र त्याच्या नेतृत्वाखाली संघ अधिक चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे आगामी सीझनमध्ये फ्रँचायझीने शिखर धवनवर विश्वास दर्शवला आहे.

आयपीएलमध्ये धवन सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, मात्र, सध्या तो भारताकडून केवळ एकदिवसीय फॉरमॅटमध्येच खेळत आहे. अलीकडेच धवनला वनडेमध्ये भारताच्या ब संघाचा कर्णधार बनवण्यात आले. या महिन्याच्या अखेरीस तो न्यूझीलंडमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. धवनने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्वही केले आहे.

आयपीएल 2023 पूर्वी पंजाबच्या संघाने आपले मुख्य प्रशिक्षकही बदलले आहेत. अनिल कुंबळेच्या जागी ट्रेव्हर बेलिस यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली इंग्लंड संघाने 2019 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. ट्रेवर बेलिसने 2012 आणि 2014 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल चॅम्पियन बनवण्यातही योगदान दिले आहे. बेलिससोबत ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॅडिनही पंजाबच्या कोचिंग स्टाफचा भाग असेल.

संघाच्या मालकांना नवीन प्रशिक्षक आणि कर्णधाराकडून मोठ्या आशा आहेत. पंजाबचा संघ शेवटचा 2014 साली प्ले ऑफमध्ये पोहोचला होता. यानंतर हा संघ गेल्या चार सीझनमध्ये सहाव्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT