क्रीडा

Shikhar Dhawan : शेवटी गब्बरच तो.. कॅच हाताने नाही तर पकडला पायाने; VIDEO व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Shikhar Dhawan Took Funny Catch : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकतील पहिल्या वनडे सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण हे अत्यंत सुमार दर्जाचे झाले होते. दुसऱ्या सामन्यात देखील भारताने काही झेल सोडलेच. दरम्यान, भारताच्या क्षेत्ररक्षणाचा घसरलेला स्तर दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवनने शाकिब अल हसनचा कसा हास्यास्यपद प्रकारे झेल पकडला हे दिसते.

शिखर धवन तसा सेफ फिल्डिर म्हणून गणला जातो. मात्र संघातील गचाळ क्षेत्ररक्षणाचे वारे त्यालाही लागले. बांगलादेश फलंदाजी करत असताना 17 व्या षटकात शाकिब अल हसनने वॉशिंग्टन सुंदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू शाकिबच्या बॅटची कडा घेऊन वर उडाला. यावेळी शॉर्ट फाईन लेगला उभा असणारा शिखर धवन झेल घेण्यासाठी सरसावला. याचबरोबर मोहम्मद सिराज देखील या कॅचसाठी प्रयत्न करताना दिसला.

दरम्यान, दोघेही कॅच घेण्यासाठी आल्याने शिखर धवनच्या हातातून चेंडू निसटला. मात्र गब्बरने हा चेंडू आपल्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांमध्ये अलगत पकडत झेल पूर्ण केला. दरम्यान, गब्बर झेल पकडतो की नाही हे पाहण्याच्या उत्सुकतेत वॉशिंग्टन सुंदर जमिनीवरच झोपला. अखेर गब्बरने शड्डू ठोकत आपण हाताने नाही तर पायानेही झेल पकडू शकतो हे दाखवून दिले.

बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 7 बाद 271 धावा ठोकल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने नाबाद शतकी तर मोहम्मदुल्लाने 77 धावांची झुंजार खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी डावाच्या सुरूवातीला बांगलादेशला धक्क्यावर धक्के देत त्यांची अवस्था 6 बाद 69 धावा अशी केली होती. मात्र मेहदी हसन मिराझने मोहम्मदुल्लाच्या (77) साथीने सातव्या विकेटसाठी 147 धावांची दमदार भागीदारी रचली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : गुजरातमध्ये भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रता

SCROLL FOR NEXT