Shikhar Dhawan 
क्रीडा

Shikhar Dhawan : 'बदनामी करणारे वक्तव्य नको...' दिल्ली कोर्टाने शिखर धवनच्या बायकोला झापलं

भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे. याप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, धवनची पत्नी आयेशाला दिल्ली कोर्टाने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. (Shikhar Dhawan Wife Ayesha Mukherjee Divorce Delhi court)

धवन विरुद्ध कुठेही आणि कधीही बदनामी करणारे वक्तव्य करु नयेत असे आदेश कोर्टाने आयेशाला दिले आहेत. शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू आहे.

दरम्यान, आयेशा आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याची याचिका धवनने न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आयेशाला तसे न करण्याचे आदेश दिले आहेत.

शिखर आणि आयेशा यांचे जेव्हा लग्न झाले होते तेव्हा त्याच्यावर जोरदार टीका झली होती. कारण आयोशा त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी होती आणि तिचा यापूर्वीही घटस्फोट झाला होता. पण यावेळी धवनच्या आईने त्याला साथ दिली होती.

त्यामुळे २०१२ साली शिखर आणि आयेशा यांचे लग्न झाले होते. त्यानंतर २०१४ साली शिखर आणि आयेशा यांना मुलगा झाला आणि त्यांनी त्याचे नाव जोराव्हर असे ठेवले होते. पण गेल्या वर्षी शिखर आणि आयेशा यांच्यामध्ये काही तरी बिनसल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT