Olympic Qualifying Tournament  sakal
क्रीडा

Olympic Qualifying Tournament : थापा, देवकडून भारताला अपेक्षा

भारतीय खेळाडूंची जागतिक बॉक्सिंग ऑलिंपिक पात्रता फेरीमधील सुमार कामगिरी सोमवारी मध्यरात्रीही कायम राहिली. लक्ष्य चहर याला पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात पराभूत व्हावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

बुस्टो अर्सिझिओ (इटली) : भारतीय खेळाडूंची जागतिक बॉक्सिंग ऑलिंपिक पात्रता फेरीमधील सुमार कामगिरी सोमवारी मध्यरात्रीही कायम राहिली. लक्ष्य चहर याला पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश करण्याच्या त्याच्या आशांना सुरुंग लागला. आता शिवा थापा व निशांत देव यांच्या लढती उद्या (ता. ६) असणार आहे. या दोघांकडून भारताला विजयाची आशा आहे.

पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रता फेरी असल्यामुळे या स्पर्धेला महत्त्व प्राप्त आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये भारताच्या नऊ खेळाडूंचा सहभाग आहे; मात्र भारताच्या चार खेळाडूंचे आव्हान सोमवार रात्रीपर्यंतच संपुष्टात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत तरी भारतासाठी ही स्पर्धा आनंददायी ठरलेली नाही. या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणारे खेळाडू पॅरिस ऑलिंपिक कोटा मिळवण्यात यशस्वी होणार आहेत.

जागतिक स्पर्धेमध्ये ब्राँझपदक जिंकणाऱ्या दीपक भोरिया याला ५१ किलो वजनी गटात, आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक पटकावणाऱ्या नरेंदर बेरवाल याला ९२ पेक्षा जास्त किलो वजनी गटात आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या जास्मिन लामबोरिया हिला ६० किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला.

विजेत्यांशी लढावे लागणार

शिव थापा ६३.५ किलो वजनी गटात, तर निशांत देव ७१ किलो वजनी गटात सहभागी होणार आहे. शिव थापासमोर जगज्जेता रुसलान अब्दुल्ला या खेळाडूचे आव्हान असून निशांत देव याला युरोपियन स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या लुईस रिचर्डसन याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

बँकॉकमध्ये पुढील संधी

आतापर्यंत पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय बॉक्सर्सना आणखी एक संधी मिळणार आहे. २३ मे ते ३ जून या दरम्यान बँकॉक येथे जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमधून खेळाडूंना पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट बुक करता येणार आहे.

चार खेळाडूंनी मिळवला कोटा

आतापर्यंत भारताच्या चार खेळाडूंनी पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवला आहे. निखत झरीन (५० किलो वजनी गट), प्रीती पवार (५४ किलो वजनी गट), परवीन हुडा (५७ किलो वजनी गट), लवलिना बोर्गोहेन (७५ किलो वजनी गट) या बॉक्सर्संनी भारतासाठी मोलाची कामगिरी करून पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT