shivam dubes big hits will come in handy at t20 world cup believes ravi shastri  Sakal
क्रीडा

शिवम दुबे आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा गाजवेल - रवी शास्त्री

विश्वकरंडक स्पर्धेसाठी प्रथमच स्थान मिळालेला दुबे हा मध्यमगती गोलंदाजही आहे; पण मधल्या फळीतील त्याची फलंदाजी भल्याभल्यांना चकित करणारी ठरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : टोलेजंग षटकार मारण्याची ताकद असलेला शिवम दुबे आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा गाजवेल, भारतीय संघासाठी तो सर्वात महत्त्वाचा हुकमी खेळाडू ठरणार आहे, असा विश्वास माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी प्रथमच स्थान मिळालेला दुबे हा मध्यमगती गोलंदाजही आहे; पण मधल्या फळीतील त्याची फलंदाजी भल्याभल्यांना चकित करणारी ठरत आहे. चेन्नई संघातून खेळताना त्याने ११ सामन्यातून ३५० धावा केल्या आहेत, त्यापेक्षा त्याचा १७० पेक्षा अधिक असलेला स्ट्राईक रेट अफलातून आहे. युवराज सिंगप्रमाणे त्याची सिक्सर किंग अशी ओळख निर्माण झाली आहे. यंदाच्या स्पर्धेत केवळ अभिषेक शर्माने दुबेपेक्षा अधिक षटकार (२६) मारले आहेत.

दुबेवर लक्ष ठेवा आणि तो खतरनाक फलंदाज आहे. तो प्रतिस्पर्ध्यांना गारद करू शकतो, तो मॅचविनरही आहे, असे शास्त्री यांनी आयसीसीच्या संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. तो अगदी सहजतेने षटकार मारतो आणि फिरकी गोलंदाजांना संपवूनच टाकतो, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.

आपल्याला कशाप्रकारे फलंदाजी करण्याची गरज आहे याची चांगली जाणीव त्याला आहे. त्यामुळे पाचव्या-सहाव्या क्रमांकासाठी तो योग्य फलंदाज आहे. २०-२५ चेंडूत तो सामन्याचा निकाल बदलू शकतो, असेही दुबेचे कौतुक शास्त्री यांनी केले.

सध्याचा फॉर्म पाहता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा स्ट्राईक रेट भारतीय संघासाठी काहीसा चिंतेचा आहे. या विश्वकरंडक स्पर्धेत भारताला अपेक्षा कायम ठेवायच्या असतील तर या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे.

भारतीय संघासाठी दुबेप्रमाणे यशस्वी जयस्वालही महत्त्वाचा खेळाडू आहे. सलामीला जयस्वालने जोरदार खेळ केला आणि मधल्या फळीत दुबेने टोलेबाजी केली तर भारताचे भवितव्य चांगले असेल, असे शास्त्री म्हणतात.

जयस्वालचा स्ट्राईक रेट २०० च्या जवळपास आहे. त्याने अशीच कामगिरी केली तर भारताला १९० ते २०० धावा करणे कठीण जाणार नाही आणि एवढ्या धावा विश्वकरंडकसारख्या स्पर्धेत निर्णायक ठरत असतात, असे शास्त्री यांनी सांगितले.

पहिल्या चारही फलंदाजांकडून शतके

ट्वेन्टी-२० प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सोमवारी शतक केले, त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार या पहिल्या चारही फलंदाजांनी या आयपीएलमध्ये शतके केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT