क्रीडा

IND vs SL : w,w,w,w शिवमची सुंदरम कामगिरी तर अक्षरने खेचून आणला शेवटच्या चेंडूवर नव्या वर्षातला पहिला विजय

अनिरुद्ध संकपाळ

India vs Sri Lanka 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिलाच सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेलने फक्त 1 धाव दिल्यामुळे भारताने सामना अवघ्या 2 धावांनी जिंकत नव्या वर्षाची सुरूवात विजयाने केली. भारताने श्रीलंकेसमोर 163 धावांचे आव्हान ठेवले होते. लंकेला 160 धावा करता आल्या. भारताकडून शिवम मावीने प्रभावी मारा करत 4 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

भारताकडून उमरान मलिकनेही मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने लंकेचा झुंजार कर्णधार शानकाला 45 धावांवर बाद केले. तेथूनच भारताने सामन्यावर पकड मजबूत केली.

भारताच्या पदार्पण करणाऱ्या शिवम मावीने आपल्या पहिल्या दोन षटकात दोन फलंदाज बाद करत श्रीलंकेची अवस्था 4 षटकात 2 बाद 24 धावा अशी केली. यानंतर श्रीलंकेने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी पॉवर प्लेनंतर लंकेची कोणतीच जोडी स्थिरावू दिली नाही. उमरानने चरीथ असलंकाला 12 धावांवर तर हर्षल पटेलने कुसल मेंडीस (28) आणि भानुका राजपक्षे (10) या दोघांना माघारी धाडले.

11 व्या षटकात श्रीलंकेची अवस्था 5 बाद 68 धावा अशी झाल्यानंतर हसरंगा आणि कर्णधार शानका यांनी 23 चेंडूत 40 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. मात्र 15 व्या षटकात पहिलाच सामना खेळणाऱ्या शिवम मावीने ही जोडी फोडली. त्याने 10 चेंडूत 210 च्या स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या हसरंगाला 21 धावांवर बाद केले.

मात्र भारताच्या विजयात श्रीलंकेचा कर्णधार शानका उभा होता. त्याने 27 चेंडूत 45 धावा चोपत सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. मात्र उमरान मलिकने त्याला मोक्याच्या क्षणी बाद करत भारताची सामन्यावरील पकड मजबूत केली. त्यानंतर शिवम मावीने आपला तीक्षाणाला बाद करत आपला चौथा बळी टिपला.

सामना भारताच्या हातात आला असे वाटत असतानाच चमिका करूणारत्नेने लंकेला 19 व्या षटकात 150 धावांपर्यंत पोहचवले. आता शेवटच्या षटकात लंकेला विजयासाठी 13 धावांची गरज होती. अक्षर पटेलने शेवटचे षटक टाकले. पहिला चेंडू वाईड, त्यानंतच्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव टाकल्यानंतर अक्षरने तिसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ला. यामुले सामना 3 चेंडूत 5 धावा असा आला. अक्षरने चौथा चेंडू निर्धाव टाकत दबाव वाढवला. पाचव्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या नादात रजिता धावबाद झाला. त्यामुळे सामना 1 चेंडू 1 विकेट आणि 4 धावा असा आला. स्ट्राईकवर 15 चेंडूत 22 धावा करणारा करूणारत्ने होता. शेवटच्या चेंडूवर अक्षरने एकच धाव देत सामना जिंकून दिला.

तत्पूर्वी, श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताची अवस्था 5 बाद 94 धावा अशी झाली असताना दीपक हुड्डाने (नाबाद 41 धावा) झुंजार खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्याने अक्षर पटेलच्या (नाबाद 31 धावा) साथीने सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत नाबाद 68 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. यामुळे 15 व्या षटकात 5 बाद 94 अशी अवस्था झालेल्या भारताने 20 षटकात 5 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून इशान किशननेही 37 तर कर्णधार हार्दिक पांड्याने 29 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT