Shoaib Akhtar brutally Criticize Team India esakal
क्रीडा

Shoaib Akhtar : शोएब अख्तर म्हणतो, ...म्हणून तुमचा पराभव होणारच होता!

अनिरुद्ध संकपाळ

Shoaib Akhtar brutally Criticize Team India : टी 20 वर्ल्डकपमधील सेमी फायनलमध्ये भारताने इंग्लंडविरूद्धचा सामना वाईट पद्धतीने हरला. इंग्लंडने भारताचा तब्बल 10 विकेट्स राखून पराभव केला. भारतीय गोलंदाजांना इंग्लंडची साधी एक विकेट देखील घेता आली आहे. जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने 170 धावांची नाबाद सलामी देत भारताचे आव्हान 16 षटकातच पार केले. भारताचा सेमी फायनलमध्ये दारून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताच्या पराभवाला गोलंदाजांना जबाबदार धरले. त्याने भारत अत्यंत वाईट पद्धतीने हरल्याची टीका देखील केली.

भारत सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर शोएब अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत भारतीय संघाला शेलक्या भाषेत फैलावर घेतले. शोएब अख्तर म्हणाला की, 'भारतासाठी हा एक लाजीरवणा पराभव आहे. ते खूप घाणेरड्या पद्धतीने खेळला. त्यामुळे तुमचा पराभव होणारच होता. भारताची अतिंम फेरीसाठी पात्र होण्याची लायकी नव्हती. वातावरण वेगवान गोलंदाजांना पोषक होते. मात्र भारताकडे वेगाने चेंडू टाकणारा एकही गोलंदाज नाही. मला कळत नाही की त्यांनी युझवेंद्र चहलला का खेळवले नाही. भारताची संघ निवड खूप गोंधळ निर्माण करणारी होती.'

अख्तर पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी भारताने नाणेफेक गमावली त्यावेळीत त्यांचे चेहरे पडले होते. इंग्लंडने ज्याप्रकारे पहिल्या पाच षटकात फलंदाजी केली त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी तर हातच वर केले होते. भारताने थोडीफार तरी झुंज द्यायला हवी होती. गोलंदाजांनी राऊंड द विकेट गोलंदाजी करायला हवी होती. काही बाऊन्सर टाकायला हवे होते. कोणत्याप्रकारची आक्रमकता दिसली नाही. थोडी भांडणं तरी करायला हवी होती.'

याचबरोबर अख्तरने भारताच्या टी 20 संघात नेतृत्व बदल होण्याचे संकेतही दिले. तो म्हणाला की, हार्दिक पांड्या न्यूझीलंडमधील टी 20 मालिकेसाठी कर्णधार असणार आहे. हार्दिक पांड्याच आता कायमचा टी 20 संघाता कर्णधार होतो की काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT