Shoaib Akhtar Babar Azam esakal
क्रीडा

Shoaib Akhtar Babar Azam : बाबरची लायकी विराट एवढी नाही; शोएब अख्तरनेच केला पाणउतारा

अनिरुद्ध संकपाळ

Shoaib Akhtar Babar Azam : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची कायम भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीशी तुलना केली जाते. बाबर आझमने विराट कोहलीचे अनेक विक्रम मोडले आहेत. बाबर गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानकडून सातत्यापूर्ण कामगिरी करत आहे.

मात्र पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मात्र बाबर आझमला घरचा आहेर दिला. त्याने बाबर आझमने अजून विराट कोहली एवढी लायकी निर्माण केलेली नाही. शोएबने बाबर आझमच्या बोलण्याचा पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. शोएबने एका मुलाखतीत सांगितले की बाबर आजम ब्रँड होऊ शकत नाही.

बाबर आझम नीट बोलू शकत नाही, असे शोएब अख्तरचे म्हणणे आहे. त्याला इंग्रजी येत नसल्याबद्दलही बोलले. तो एका मुलाखतीत म्हणाला - क्रिकेट खेळणे आणि मीडियाशी बोलणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला नीट बोलता येत नसेल तर तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण आहे.

अख्तर पुढे म्हणाले की, आता तुम्ही बघा, टीममध्ये एकही पात्र नाही. बोलायला मार्ग नाही. ते सादरीकरणासाठी येतात तेव्हा किती विचित्र वाटते. इंग्रजी शिकणे आणि बोलणे किती कठीण आहे?

दिग्गज पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने स्टार फलंदाज बाबर आझम पाकिस्तानमधील सर्वात मोठा ब्रँड बनण्यात का अपयशी ठरला हे सांगितले. अख्तर म्हणाले, 'मला उघडपणे सांगायचे आहे की बाबर आझम हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा ब्रँड असावा, पण तो पाकिस्तानमधील सर्वात मोठा ब्रँड का बनला नाही? कारण तो बोलू शकत नाही. जाहिरातीत फक्त मी, आफ्रिदी आणि वसीम भाई का दिसत आहेत. कारण आपण ते काम म्हणून घेतो.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT