Shoaib Malik and Sania Mirza Divorce Pakistani actress explanation esakal
क्रीडा

सानिया शोएबच्या लव्हस्टोरीत मिठाचा खडा टाकणाऱ्या आयेशाने दिलं स्पष्टीकरण

पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरने शोएबसोबतच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं

सकाळ डिजिटल टीम

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. दोघांचा घटस्फोट झाला आहे. मात्र, दोघेही अधिकृत घोषणेच्या प्रतिक्षेत असल्याचे समजते. अशातच दोघांच्या लव्हस्टोरीत मिठाचा खडा टाकणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरने शोएबसोबतच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (Shoaib Malik and Sania Mirza Divorce Pakistani actress explanation)

नोव्हेंबर २०२१ मध्ये, शोएबने आयशासोबत एका मासिकासाठी फोटोशुट केले होते. दोघांचे फोटो आणि पोज खूपच बोल्ड होते. त्यामुळे दोघांच्या केमेस्ट्रीची चर्चा अधिक रंगली होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या नात्यात दुरावा आला आहे. दोघांनीही घटस्फोट घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आयशा उमरने शोएबसोबतच्या नात्यासोबत खुलासा केला आहे.

काय म्हणाली शोएब?

अनेक चाहते आयशाला शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाची जबाबदार धरले आहे. दरम्यान, आयशाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत एक निवेदन दिले आहे. एका चाहत्याने तिला विचारले की, तु मलिकसोबत लग्न करणार आहे का? ज्याला उत्तर देताना आयशा म्हणाली, 'नाही'! अजिबात नाही, तो विवाहित आहे आणि तो आपल्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे. शोएब आणि सानिया या दोघांबद्दल मला प्रचंड आदर आहे. शोएब आणि मी चांगले मित्र आहोत आणि एकमेकांची काळजी घेतो आणि खूप आदर करतो. असे संबंध दोन व्यक्तींमध्ये देखील होऊ शकतात. असे स्पष्टीकरण आयशाने दिले आहे.

हेही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

आयशा उमरने टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यासोबतच पाकिस्तानी चित्रपटांमध्येही हात आजमावला आहे. लव्ह मे गम आणि मैं हूं शाहिद आफ्रिदी या चित्रपटांमध्ये तिने आयटम नंबर केले. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. यानंतर ती २०१७ मध्ये आलेल्या ‘यलगार’ चित्रपटात दिसली होती. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या सात दिन मोहब्बत इनमध्येही आयशा दिसली होती. २०१८ मध्ये तिने न्यूयॉर्क फॅशन वीकमध्येही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT