Shoaib Malik T20 Cricket Record  esakal
क्रीडा

Shoaib Malik : निकाह 'जाहीर' केल्यानंतर अवघ्या काही तासात मलिकने टी 20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला

शोएब मलिकने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये केला मोठा धमाका

अनिरुद्ध संकपाळ

Shoaib Malik T20 Cricket Record : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक आज दिवसभर प्रकाशझोतात आहे. त्याने नुकतेच अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केल्याचं जाहीर केलं. हा शोएबचा तिसरा निकाह आहे. या वृत्तानंतर त्याने सानिया मिर्झासोबतचा संसार मोडलाय यावर शिक्कामोर्तब झालं. (Shoaib Malik Marriage)

दरम्यान, सना जावेदसोबत निकाह झाल्याचं जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासात शोएब मलिकने टी 20 क्रिकेटमध्ये एक माईल स्टोन पार केला. शोएब मलिक हा टी 20 क्रिकेटमध्ये 13000 धावा पूर्ण करणारा आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्युन बरिशालसंघाविरूद्ध रंगपूर रायडर्सकडून खेळताना ही कामगिरी केली.

शोएब मलिकने यापूर्वीच कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र तो टी 20 क्रिकेट सातत्याने खेळतो आहे. मलिने युएसए आणि वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या संघनिवडीसाठी तो उपलब्ध असल्याचे जाहीर केलं आहे.

शोएब मलिकने आजच आपण सना जावेद सोबत निकाह केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्याचा सानिया मिर्झासोबत काडीमोड झाल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

शोएब मलिकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या निकाहचे फोटो शेअर केले. सना जावेद ही पाकिस्तानची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मलिक आणि सनाच्या अफेअरची चर्चा ही 2022 पासून सुरू झाली.

त्यावेळी सानिया मिर्झाने शोएब मलिकसोबत तलाक घेण्यासाठी अर्ज केल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियामध्ये आले होते. यानंतर या स्टार कपलमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या वारंवार बातम्या येत होत्या अखेर शोएब मलिकच्या तिसऱ्या निकाहमुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT