Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनू भाकर हिने ब्राँझपदक मिळवले अन् अख्या जगावर राज्य केलं. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला म्हणून इतिहासात तिन तिचं नाव कोरलं. देशभरात सध्या मनू भाकरचीच चर्चा पाहायला मिळत आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. पण तिच्या खेळासोबत तिच्या यशामध्ये तिच्या मानेवर असलेल्या टॅटूचेही मोलाचे योगदान आहे. टोकियोच्या अपयशानंतर तिनं तो एक मंत्र आपल्या मानेवर कोरला अन् आता ती...
भारताची २२ वर्षीय महिला नेमबाज मनू भाकर हिने रविवारी फ्रान्समधील शूटिंग रेंजवर अचूक लक्ष्य साधून ऐतिहासिक यश संपादन केले. ‘पिस्तूल क्वीन’ मनू हिने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदकावर मोहर उमटवत भारताचे पॅरिस ऑलिंपिकमधील पदकाचे खाते रुबाबात उघडले.
ऑलिंपिकच्या इतिहासात नेमबाजी या खेळामध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. लंडन ऑलिंपिकनंतर भारताने नेमबाजी या खेळामध्ये पदक जिंकले. भारताने १२ वर्षांनंतर नेमबाजीमध्ये पदकावर निशाणा साधला.
"स्टिल आय राईज''! मनू भाकरला ऑलिम्पिक पदकासाठी प्रेरित करणारं 'टॅटू';
अनेक विश्वचषक विजेत्या मनू भाकरला कवयित्री आणि मानवाधिकार कार्यकर्त्या माया अँजेलो यांच्या कवितेतून 'स्टिल आय राइज' टॅटू बनवण्याची प्रेरणा मिळाली, ज्याचे शीर्षक देखील तेच आहे.
ही प्रसिद्ध कविता लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. अडचणी आणि निराशेच्या काळात लोकांना पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा या कवितेतून मिळते.
भारताची ऑलिम्पियन नेमबाज मनू भाकर हिने या कवितेतून प्रेरणा घेतली असून ती आता ऑलिम्पिक पदक विजेती आहे.
म्हणून हा टॅटू गोंदवण्याचा निर्णय घेतला
2023 मध्ये, बीबीसी पंजाबीचे सहयोगी क्रीडा पत्रकार सौरभ दुग्गल यांनी चंदीगडमध्ये एका खाजगी कार्यक्रमादरम्यान भारतीय नेमबाज मनू भाकरची मुलाखत घेतली होती. यावेळी मनू भाकरनं माया अँजेलो यांच्या कवितेतून घेतलेली 'स्टिल आय राइज' टॅटू बनवण्याची प्रेरणा आणि टोकियो ऑलिम्पिकदरम्यानच्या निराशाजनक कामगिरीबद्दल भाष्य केलं.
'स्टिल आय राईज', हे केवळं शब्द नाहित तर तुमच्या कठीण काळात स्वतःला सिद्ध करण्याची एक ताकद आहे. हे शब्द माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. ते माझा दृढनिश्चय आणखी वाढवतात, मला कितीही अपयश आले तरी मी पुन्हा उभा राहीन असा मला विश्वास देतात. अशी भावना तिनं यावेळी व्यक्त केली होती.
टोकियो 2020 साली पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणाऱ्या मनु भाकरची पिस्तुल फुटली होती. त्यामुळे 2020 साली संधी हुकल्यानंतर तिने खचून न जाता आपला सराव सुरू ठेवला. मनु भाकरला तेव्हा मोठा धक्का बसला होता. परंतु तिने दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कमबॅक केल्याचं सर्व देशवासियांनी पाहिलं.
पुन्हा खेळात कमबॅक मिळवण्यासाठी 'स्टिल आय राईज', या कवितेची प्रेरणा घेतली आणि मानेवरती हा टॅटू गोंदवला. असं मनू भाकरनं यावेळी आपली भावना व्यक्त केली.
मनु भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावले. कोरियाच्या ओ ये जिनने 243.2 गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिक विक्रमही केला. कोरियाची किम येजी रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. त्याने 241.3 धावा केल्या. तिचे सुवर्ण कमी फरकाने हुकले. मनु भाकरने 221.7 गुण मिळवत कांस्यपदक मिळवलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.