Indian archers bag two bronze medals in World Cup Stage 4  
क्रीडा

Archers World Cup: भारतीय तिरंदाजांकडून ब्राँझपदकांचा वेध! रिकर्व्ह प्रकारात पुरुष व महिलांचे शानदार यश

सकाळ ऑनलाईन टीम

भारतीय तिरंदाजांनी बुधवारी कंपाऊंड प्रकारातील सांघिक दोन्ही गटात (पुरुष व महिला) अंतिम फेरीत प्रवेश करून किमान रौप्यपदक पक्के केल्यानंतर आता रिकर्व्ह प्रकारातील सांघिक गटातही भारतीय तिरंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने जागतिक तिरंदाजी स्पर्धेतील (स्टेज फोर) पुरुष व महिला या दोन्ही गटात ब्राँझपदकावर मोहोर उमटवत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. भारताच्या पुरुषांच्या रिकर्व्ह संघात धीरज बोम्मादेवरा, अतनू दास व तुषार शेळके या तिरंदाजांचा समावेश होता. तसेच महिलांच्या रिकर्व्ह संघात भजन कौर, सिमरनजीत कौर व अंकिता भकत या तिरंदाजांचा समावेश होता.

पुरुषांच्या विभागातील रिकर्व्ह प्रकारातील सांघिक गटाच्या पात्रता फेरीत भारताने २०३४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. दक्षिण कोरियाचा संघ २०७६ गुणांसह पहिल्या स्थानावर राहिला. चीनने २०२७ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. भारताच्या पुरुष संघाला पहिल्या फेरीत बाय (पुढे चाल) मिळाली. त्यानंतर मेक्सिकोवर ६-० असा सहज विजय मिळवताना भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताकडून कॅनडाचा ५-१ असा पराभव झाला, पण उपांत्य फेरीत चीनने भारतावर ६-० अशी मात करीत अंतिम फेरीत पाऊल ठेवले. कोरिया व चीन यांच्यामध्ये सुवर्णपदकासाठी लढत होईल. भारतीय पुरुष संघाने ब्राँझपदकासाठीच्या लढतीत स्पेनवर ६-२ अशी मात केली.

महिलांचा मेक्सिकोवर विजय

महिला विभागातील रिकर्व्ह प्रकारातील सांघिक गटात भारतीय संघाला पात्रता फेरीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत बाय (पुढे चाल) मिळाल्यानंतर भारताने पुढील फेरीत जपानला ६-२ असे नमवले. भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत इटलीचे आव्हान ५-१ असे संपुष्टात आणले, पण उपांत्य फेरीत भारतीय संघाला चीन तैपईवर विजय संपादन करता आला नाही. चीन तैपईने भारताला ६-० असे हरवले. मात्र भारतीय संघाने ब्राँझपदकासाठीची लढत रोमहर्षकपणे जिंकली. भारत व मेक्सिको या दोन्ही देशांमध्ये ४-४ अशी बरोबरी झाली. पहिल्या दोन सेटमध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय महिला तिरंदाजांनी पुढील दोन सेटमध्ये बाजी मारली आणि बरोबरी साधली. पाचव्या सेटमध्ये भारतीय महिलांनी २७ गुणांची कमाई करीत २५ गुणांची कमाई करणाऱ्या मेक्सिकोला नमवले आणि ब्राँझपदकाची माळ गळ्यात घातली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT