INDW vs ENGW ESAKAL
क्रीडा

INDW vs ENGW : RCB ची श्रेयांका अन् MI च्या सैका इशाकचं आंतरराष्ट्रीय पदार्पण; स्मृती, हरमनच्या हातून मिळाली कॅप

अनिरुद्ध संकपाळ

INDW vs ENGW : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात आज दोन युवा महिला क्रिकेटपटूंनी आज आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आरसीबीची फिरकीपटू आणि फलंदाज श्रेयांका पाटील आणि मुंबई इंडियन्सची फिरकीपटू सैका इशाक यांनी आज आपलं आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

श्रेयांका पाटीलला स्मृती मानधनाच्या हातून तर सैका इशाकला हरमनप्रीत कौरच्या हातून पदार्पणाची कॅप देण्यात आली.

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरूद्धच्या पहिला टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर बोलताना हरमनप्रीतने आपल्या प्लेईंग 11 ची घोषणा केली. तिने ऑफ स्पिनर आणि फलंदाज असलेली श्रेयांका पाटील आणि डावखुरी फिरकी गोलंदाज सैका इशाक या दोघी भारताकडून पदार्पण करणार असल्याचं सांगितलं.

वुमन्स प्रीमियर लीगचा पहिला हंगाम जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून खेळणारी इशाकने आपल्या फिरकी गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं होते. त्याचबरोबर जरी आरसीबीसाठी पहिला हंगाम एक वाईट स्वप्न ठरला असला तरी अष्टपैलू श्रेयांकाने आपल्या झुंजार खेळीने छाप सोडली होती.

श्रेयांका पाटीलला भारतीय अ संघाकडून देखील खेळण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी देखील तिने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. श्रेयांकाकडे भारताची उद्याची स्टार अष्टपैलू म्हणून पाहिलं जातं.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. रेणुका ठाकूरने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सोफिया डंक्ले आणि एलिस कॅप्सेचा अडसर दूर केला. मात्र त्यानंतर डॅनियल वॅट आणि नॅट सिव्हर ब्रंट यांनी धडाकेबाज फलंदाजी करत 10 षटकात 2 बाद 89 धावांपर्यंत मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Success Story: जिद्द, मेहनत आणि धाडसी निर्णय; यूपीएससी आयएफएस परीक्षेत अभिषेक कत्ते यशस्वी, देशसेवेची ओढ ठरली यशाची गुरुकिल्ली..

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

सहा महिन्यात विजय यांचं सरकार कोसळणार, स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री होणार; आमदाराचा मोठा दावा? राजकारण तापलं

Leopard Attack: गंगापूर तालुक्यात बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्याच्या वासराला ठार केल्याने भीतीचे वातावरण, शेतकरी हवालदिल..

Parbhani News: परभणीत एसटी बसला दीड किलोमीटरचा फेरा वाहतूक कोंडीवर उपाय नाही, उलट प्रवाशांचा वेळ - इंधन वाया

SCROLL FOR NEXT