Shreyas Iyer IND vs ENG esakal
क्रीडा

Shreyas Iyer IND vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का, मधल्या फळीतील फलंदाज दुखापतीमुळे बाहेर?

Shreyas Iyer IND vs ENG : भारत आधीच दुखापतींनी त्रस्त आहे त्यात अजून एका खेळाडूची भर पडणार?

अनिरुद्ध संकपाळ

Shreyas Iyer IND vs ENG : भारताचा मधल्या फळीतीली फलंदाज श्रेयस अय्यरला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर आधीच संघातून डच्चू मिळण्याची टांगती तलवार लटकत होती.

मात्र आता त्याचे दुखापतीचे वृत्त समोर येत आहे. तो इंग्लंडविरूद्धच्या पुढच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अय्यरला पाठीदुखीचा त्रास होत आहे. तसेच त्याचा मांडीचा स्नायू देखील दुखत आहे.

भारतीय संघाला आधीच दुखापतींचा फटका बसला आहे. केएल राहुल, रविंद्र जडेजा अन् मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. मालिकेत भारताने 1 - 1 अशी बरोबरी साधली आहे. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा तिसऱ्या कसोटीत संघात परतण्याची शक्यता आहे. अय्यरच्या दुखापतीमुळे मधल्या फळीत पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार अय्यर हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतींबाबत चाचण्या करून घेणार आहे. दुसरीकडे भारतीय निवडसमितीला अजून विराट कोहली तिसरा कसोटी सामना खेळणार आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे संघ निवड देखील लांबणीवर पडत आहे.

जर श्रेयस अय्यर दुखापतीमुळे इंग्लंडविरूद्धच्या तीनही कसोटी सामन्यांना मुकणार असेल तर त्याच्या रिप्लेसमेंटचा निर्णय घेणं कठिण जाणार आहे. अय्यरची जागा घेण्यासाठी हनुमा विहारी, मयांक अगरवाल आणि रजत पाटीदार हे रेसमध्ये आहेत. निवडसमितीला इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत सर्वोकृष्ट प्लेईंग 11 निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT