shreyas iyer new Mercedes Benz suv
shreyas iyer new Mercedes Benz suv 
क्रीडा

श्रेयस अय्यरचा सुपरसिक्सर, विकत घेतली करोडो रुपयांची मर्सिडीज; पहा फोटो

सकाळ ऑनलाईन टीम

shreyas iyer new Mercedes Benz suv: कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्या आलिशान लिफे जगण्यासाठी ओळखला जातो. श्रेयस अय्यर मैदानाच्या आत क्रिकेटबद्दल जितका गंभीर असतो तितकाच तो मैदानाबाहेरही शांत असतो. श्रेयस अय्यरला महागड्या गाड्यांचा भरपूर शौक आहे. श्रेयस अय्यरने आताच एक आलिशान Mercedes-AMG G 63 4Matic SUV खरेदी केली आहे. त्याची किंमत 2.45 कोटी आहे. त्याच्या स्पीडबद्दल बोलायचे झाले तर ही SUV फक्त 4.5 सेकंदात 0 ते 100 प्रति तास वेग पळते.

सोशल मीडियावर फोटो शेअर करताना लँडमार्क कार्स लिहिले की, नवीन मर्सिडीज-बेंझ G-63 खरेदी केल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरचे अभिनंदन. आम्‍ही तुमच्‍या स्‍टार कुटुंबात स्‍वागत करत आहे. आम्हाला तुमच्‍या कव्‍हर ड्राईव्‍ह पाहण्‍याचा जसा आनंद होतो तसाच तुम्‍हाला या गाडीत आनंद वाटेल.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 मध्ये KKR ची कामगिरी विशेष नव्हती. त्याचा संघ प्लेऑफमध्ये ही पोचू शकली नाही. मेगा लिलावात केकेआरने श्रेयस अय्यरला १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. श्रेयस अय्यरने या हंगामात 14 सामन्यांमध्ये 30.84 च्या सरासरीने 401 धावा केल्या, त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या मोसमात श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.

श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत खेळताना दिसणार आहे. भारत 9 जून रोजी नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळणार आहे, त्यानंतर कटकला 12 जून, विशाखापट्टणमला 14 जून, राजकोटला 17 जून तर अंतिम सामना बेंगळुरू येथे जून 19 ला होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kumar Modi: बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला! सुशील कुमार मोदी यांचं निधन

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

GT vs KKR IPL 2024 : पावसामुळं गुजरातनं गाशा गुंडाळला; नाणेफेक न होताच सामना झाला रद्द

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT