India vs Australia Test Series 2023 sakal
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! हा दिग्गज खेळाडू बाहेर

कोण घेणार या दिग्गज खेळाडूची जागा ?

Kiran Mahanavar

India vs Australia Test Series 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल पाहता टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. पण या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली आहे. टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर या मालिकेतून बाहेर होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रेयस अय्यर अजूनही या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही, ज्यामुळे तो ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहर पडला आहे.

श्रेयस अय्यर हा सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) संबंधित एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला श्रेयस अय्यरबद्दल सांगितले की, 'श्रेयस अय्यरची दुखापत अपेक्षेप्रमाणे बरी झालेली नाही. त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी किमान दोन आठवडे लागतील. पहिल्या कसोटीसाठी तो निश्चितपणे उपलब्ध होणार नाही आणि दुसऱ्या कसोटीसाठी त्याची उपलब्धता त्याच्या फिटनेस अहवालावर अवलंबून असेल.

2022 हे वर्ष श्रेयस अय्यरसाठी खूप संस्मरणीय ठरले. श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी 17 वनडेत 724 धावा केल्या होत्या. तसेच तो या वर्षी भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने टीम इंडियासाठी आतापर्यंत 7 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 49 टी-20 सामने खेळले आहेत. मात्र या वर्षाची सुरुवात त्याच्यासाठी चांगली झाली नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT