ind vs aus test wtc final  sakal
क्रीडा

Team India: भारतीयांच्या आशांना मोठा धक्का! दिग्गज खेळाडू WTC फायनलमधुन बाहेर

आयपीएलच्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघासाठी वाईट बातमी...

Kiran Mahanavar

Ind vs Aus Test WTC Final : आयपीएल 2023च्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर जूनमध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे.

अय्यरच्या पाठीला दुखापत झाली, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत अय्यरला दुखापत झाली होती. ईएसपीएनक्रिकइन्फो या वेबसाइटने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

दुखापतीमुळे अय्यर आयपीएल-2023 मध्ये खेळू शकणार नाही. यापूर्वी असे वृत्त होते की अय्यर आयपीएलच्या मध्यभागी पुनरागमन करू शकतो, परंतु त्याला आयपीएलच्या चालू हंगामातूनही वगळण्यात आले आहे. कोलकाताने त्याला मागच्या वर्षीच विकत घेतले आणि कर्णधारही बनवले. या मोसमात त्याच्या जागी नितीश राणा कर्णधार आहे.

अय्यर दुखापतीच्या शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाणार असल्याचेही नवीन अहवालात सांगितले आहे. त्यामुळे तो तीन महिन्यांसाठी बाहेर असू शकतो. यानंतर तो सरावाला सुरुवात करणार आहे. या दुखापतीमुळे अय्यर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही आणि त्यानंतर तो वनडे मालिकेतूनही बाहेर पडले.

अय्यरने 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केले आणि शतक झळकावले. तो आता भारताच्या कसोटी संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे आणि म्हणूनच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याची अनुपस्थिती ही टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे.

आयपीएलमध्ये नितीश राणा त्याच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद भूषवत आहे. पण आता त्याच्या जागी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये कोण खेळणार हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT