Shreyas iyer won ICC Player of the month Award
Shreyas iyer won ICC Player of the month Award  ESAKAL
क्रीडा

Shreyas Iyer| संघात येण्यासाठी झगडणाऱ्या श्रेयसने कमावलं ICC चं मानाचं स्थान

सकाळ डिजिटल टीम

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी झगडत होता. मात्र गेल्या महिन्यात श्रेयस अय्यरने मर्यादित षटकांच्या क्रिकेटबरोबरच कसोटीतही दमदार कमागिरी करून दाखवली. याचच फलित म्हणजे अय्यरला आयीसीने फेब्रुवारी महिन्यातील (ICC Player of The Month) सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवलं. याचबरोबर न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिआ केरला देखील महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौवरण्यात आले आहे.

श्रेयस अय्यरने गेल्या महिन्यात वेस्ट इंडीजविरूद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दमदार कामगिरी केली होती. याचबरोबर श्रीलंकेबरोबरच्या मालिकेतही त्याची कामगिरी उल्लेखनीय होती. विंडीजविरूद्ध त्याने 80 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती. याचबरोबर त्याने 16 चेंडूत 25 धावांची खेळी करत टी 20 मध्ये देखील आपला दम दाखवून दिला होता. त्याने लंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत एकूण 204 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट 174.36 इतका होता.

त्याने एप्रिल महिन्यात 57(28), 74(44), 73(45) धावांची नाबाद खेळ्या केल्या होत्या. यात त्याने 20 चौकार आणि सात षटकार खेचले. त्याला मालिकावीराचा पुरस्कार देखील मिळाला होता. याबाबत श्रीलंकेचा माजी क्रिकेटर आणि व्होटिंग पॅनलचा सदस्य रसेल अर्नोल्डने 'या संपूर्ण महिन्यात श्रेयस अय्यरने जबरदस्त सातत्य दाखवले.' असे मत नोंदले. त्याने प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे नेस्तनाभूत केले. त्याला गोलंदाजी करणे अवघड होऊन बसले होते. त्याने संपूर्ण मैदानात फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. त्याने योग्य वेळी गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने त्याच्या प्रतिभेने मला प्रभावित केले. त्याने टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी झगडत असताना अशी कामगिरी केली आहे.' असे म्हणत अर्नोल्डने अय्यरची पाठ थोपटली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT