Shubhaman Gill scores a double century against West Indies A
Shubhaman Gill scores a double century against West Indies A 
क्रीडा

टीममध्ये नाय घेतलं.. अन् इकडं पठ्ठ्यानं द्विशतक ठोकलं

वृत्तसंस्था

गयाना : भारत अ आणि वेस्ट इंडीज अ यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यात शुभमन गिलने द्विशतक ठोकले. त्याने 248 चेंडूंमध्ये नाबाद 204 धावा केल्या. तसेच कर्णधार हनुमा विहारीच्या शतकाच्या जोरावर भारताने भक्कम आघाडी घेतली आहे. 

भारताने चार बाद 365 या धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. वेस्ट इंडिजसमोर आता विजयासाठी 373 धावांचे लक्ष्य आहे. दिवसाचा खेळ संपताना यजमान संघ एकही विकेट न गमावता 37 धावांपर्यंत मजल मारु शकला.

सलामीचे 4 फलंदाज झटपट बाद झाल्यावर शुभमनने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. कर्णधार हनुमा विहारीच्या साथीने भारताचा डाव सावरला. तंत्रशुद्ध फटके खेळत शुभमनने आपलं शतक साजरं केलं. भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघाकडून खेळत असताना प्रथम श्रेणी शतक झळकावणारा शुभमन सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा विक्रम मोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Viral Video : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे शिवीगाळ करणारे रॅप साँग व्हायरल?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: '...काहीही झालं तरी मी माझं पद', स्वाती मालीवाल यांनी राज्यसभेच्या राजीनाम्याबाबत केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update : आरोपी विशाल अग्रवालच्या नातेवाईकांकडून पत्रकारांना शिवीगाळ, दमदाटी

Nashik News : सिन्नरमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा कुंदेवाडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार; स्फोटानंतर खासदार शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT