IND vs ENG esakal
क्रीडा

IND vs ENG Shubman Gill : गिलचं शतक मात्र इंग्लंडचेही कमबॅक... तिसरा दिवस रंजक, चौथा ठरणार निर्णायक

IND vs ENG Shubman Gill : चौथ्या दिवसाचे पहिले सत्र ठरवणार सामन्याची दिशा

अनिरुद्ध संकपाळ

India Vs England 2nd Test Day 3 Shubman Gill : दुसऱ्या कसोटीत भारताने तिसऱ्या दिवशी दोन सत्रापर्यंत सामन्यावर पकड निर्माण केली होती. भारत जवळपास 450 ची लीड घेणार असं वाटत होतं. मात्र शेवटच्या सत्रात इंग्लंडने जोरदार कमबॅक केला.

त्यांनी भारताचा संपूर्ण संघ 255 धावात गारद करत भारताची आघाडी 399 धावांपर्यंत रोखली. इंग्लंड दुसऱ्या डावाची जवळपास 5 च्या सरासरीने सुरूवात करत भारताला टेन्शन दिलं. सलामीवीरांच्या अर्धशतकी सलामीमुळे इंग्लंडचं पारडं जड होणार असं वाटत होतं. मात्र अश्विनने पहिला धक्का देत थोडा दिलासा दिला. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडच्या 67 धावा झाल्या होत्या.

चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 332 धावा करायच्या आहेत तर भारताला अजून इंग्लंडच्या 9 विकेट्स घ्यायच्या आहेत. त्यामुळे तिसरा दिवस रंजक होता तर चौथा दिवस निर्णायक ठरणार आहे. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर ज्याचं वर्चस्व तो कसोटी जिंकण्याचा प्रबळ दावेदार असणार आहे. त्यामुळे भारताला पहिल्या सत्रात निदान तीन विकेट्स घेणं गरजेचं आहे.

भारताने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बिनबाद 28 धावांपासून आपला दुसरा डाव पुढे खेळण्यास सुरूवात केली. मात्र इंग्लंडच्या जेम्स अँडरसनच्या भेदक माऱ्यासमोर भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी फिरले.

अँडरसनने रोहितला 13 तर यशस्वी जैस्वालला 17 धावांवर बाद केलं. मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचली. ही जोडी भारताला मजबूत स्थितीत पोहचवणार असे वाटत असतानाच टॉम हार्टलीने फोडली. त्याने अय्यरला बाद केलं.

अय्यर बाद झाल्यानंतर गिलने डावाची सूत्रे हातात गेत शतकी खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर खेळतानाचे हे त्याचे पहिले कसोटी शतक ठरले. गिलला साथ देणारा अक्षर पटेलही अर्धशतकाजवळ पोहचला होता. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी फुटली गिल 104 धावा करून बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर अक्षर पटेलनेही पॅव्हेलियन गाठले. तो 45 धावांवर बाद झाला.

चहापानानंतर श्रीकार भारत आणि आर. अश्विनने भारताचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र भारत 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला कुलदीपही शुन्यावर बाद झाला. अश्विनने उपकर्णधार जसप्रीत बुमराहसोबत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. त्याने आठव्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी रचली.

मात्र भारताची आघाडी 398 धावांपर्यंत पोहचली असतानाच बुमराह 26 चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला. पाठोपाठ अश्विनही 29 धावा करून बाद झाला. भारताचा दुसरा डाव 255 धावांवर संपला. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारताचे 399 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्राऊलीने अर्धशतकी सलामी दिली. मात्र दिवस संपत असतानाच अश्विनने 28 धावा करणाऱ्या बेन डकेटला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT