Shubman Gill discharged from hospital 
क्रीडा

Shubman Gill : मोठी बातमी! शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज, वर्ल्ड कपमध्ये कधी खेळणार पहिला सामना?

Kiran Mahanavar

Shubman Gill discharged from hospital : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियासाठी कोणता सामना खेळणार? सध्या बीसीसीआयने याबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही.

शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुभमन गिल 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. डेंग्यूची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गिलला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. गिलच्या प्लेटलेटचे प्रमाण कमी झाले होते.

तो कोणत्या सामन्यासाठी तंदुरुस्त होईल की नाही हे अद्याप सांगता येणार नाही. अशा स्थितीत टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

6 ऑक्टोबर रोजीच शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. अशा स्थितीत 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात गिलच्या जागी ईशान किशनला सलामीसाठी मैदानात उतरवण्यात आले होते. यावेळी सलामीला आलेला ईशान 0 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धही केवळ इशानला संधी दिली जाऊ शकते.

शुभमन गिलने 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने आतापर्यंत 66.10 च्या सरासरीने आणि 102.84 च्या स्ट्राइक रेटने 1917 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 शतके आणि 9 अर्धशतके आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT