Wi vs Ind 2nd Test Shubman Gill sakal
क्रीडा

Wi vs Ind 2nd Test : घर के शेर, बाहर ढेर... गिलचा एका निर्णय अन् करिअर आले धोक्यात?

सकाळ ऑनलाईन टीम

Wi vs Ind 2nd Test Shubman Gill : भारतीय संघासाठी युवा फलंदाज शुभमन गिलची बॅट पुन्हा एकदा अपयशी ठरली. आयपीएल 2023 मध्ये गिलच्या बॅटने तांडव घातला होता. आयपीएलपूर्वी 2023 मध्ये गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतही त्याने शतक झळकावले होते. पण आयपीएलनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत गिल फेल ठरला. आता वेस्ट इंडिजमध्येही त्याची बॅट शांत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खुद्द शुभमन गिलने नंबर-3 वर खेळण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्याकडून धावा निघत नाहीत. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो केवळ 10 धावा करून बाद झाला होता. आता दुसऱ्या सामन्यातही गिलची बॅट शांत राहिली. अवघ्या 10 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. दोन सुरेख चौकार मारल्यानंतर गिल केमार रोचचा बळी ठरला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात गिलची विकेट पडली.

रोहित शर्माने मालिका सुरू होण्यापूर्वी सांगितले होते की, शुबमन गिलने प्रशिक्षक राहुल द्रविडशी बोलल्यानंतर नंबर-3 वर खेळण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो या क्रमांकावर खेळतो. त्याच्या जागी यशस्वीला सलामीची संधी मिळाली. यशस्वीने पहिल्या कसोटीत सलामीवीर म्हणून शतक तर दुसऱ्या कसोटीतही अर्धशतक झळकावले.

दुसरीकडे, गिलला आत्तापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर कमाल दाखवता आलेली नाही. या मालिकेत त्याला पुन्हा एकदा या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. गिल मोठी खेळी खेळू शकला नाही, तर व्यवस्थापन मोठा निर्णय घेऊ शकते.

शुभमन गिलला भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून ओळखले जात आहे, परंतु आशियाबाहेरील त्याची कामगिरी खुप खराब आहे. आशिया बाहेर गिलने कसोटीच्या शेवटच्या 8 डावांमध्ये 28, 8, 17, 4, 13, 18, 6 आणि 10 धावा केल्या. एकूण कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर गिलचा विक्रम खूपच निराशाजनक आहे. 18 कसोटींनंतर त्याने 32 डावांत केवळ 31.23 च्या सरासरीने आतापर्यंत एक हजार धावाही पूर्ण झालेल्या नाहीत. गिलने 4 अर्धशतके आणि दोन शतकांच्या मदतीने 937 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT