Virat Kohli Shubman Gill esakal
क्रीडा

Shubman Gill News : प्रिन्स पडला किंगवर भारी; टीम इंडियातलं विराटपर्व लागलं उतरतीला?

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill Yo - Yo Test : भारताचा सर्वात फिट खेळाडू अशी बिरूदावली मिरवणाऱ्या विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या यो-यो टेस्टचा स्कोअर शेअर केला. सध्या भारतीय संघ बंगळुरूजवळील अलूर येथे फिटनेस कॅम्प करत आहे.

या कॅम्पमध्ये खेळाडूंची यो - यो टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये आधी विराट कोहली आपलं वर्चस्व सिद्ध करायचा. मात्र किंग कोहलीच्या या वर्चस्वाला आता प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट शुभमन गिलने मोठे आव्हान दिले आहे. (Yo - Yo Test Virat Kohli Score)

आशिया कपपूर्वी टीम इंडियाच्या झालेल्या यो - यो टेस्टमध्ये शुभमन गिल हा सर्वात चांगल्या अंकांनी पास झाला आहे. शुभमन गिल हा 18.7 अंक घेऊन यो - यो चाचणीत टॉपवर राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघाची यो - यो चाचणी घेण्यात आली. त्यावेळी ही टेस्ट पास करण्यासाठी किमान स्कोअर हा 16.5 इतका ठेवण्यात आला होता. विराट कोहलीने 17.2 स्कोअर नोंदवला.

भारतीय संघातील सर्व खेळाडूंची यो - यो चाचणी झाली आहे. शुभमन गिलने 18.7 स्कोअर करत अव्वल स्थान पटकावले. संघातील जवळपास सर्व खेळाडूंचे स्कोअर हे 16.5 ते 18 या दरम्यान राहिले आहेत. या चाचणीत जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि केएल राहुल यांनी सहभाग घेतला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या स्पोर्ट्स सायन्स टीम आणि टीम इंडियाचा स्टोर्ट्स स्टाफ यांनी खेळाडूंसाठी गरजेच्या असलेल्या सर्व फिटनेस टेस्ट घेतल्या आहेत. ही चाचणी ज्या खेळाडूंच्या दोन स्पर्धांमध्ये मोठा गॅप होता तेच खेळाडू सहभागी होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT