Shubman Gill flop test news in marathi SAKAL
क्रीडा

Ind vs Eng : शुभमन गिलचा तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा 'फ्लॉप शो'! टीम इंडियाचा प्रिन्स जाणार संघातून बाहेर?

Kiran Mahanavar

हैदराबाद कसोटीत भारतीय संघ बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे, यामागचे एक कारण म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा शुभमन गिल. या सामन्याच्या दोन्ही डावात शुभमन गिल पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे, दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही आणि दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. शुबमन गिलचा कसोटी फॉरमॅटमधील फ्लॉप शोमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे.

हैदराबाद कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडिया 223 धावांचा पाठलाग करत असताना पहिली विकेट यशस्वी जैस्वालच्या रूपाने पडली आणि दोन चेंडूनंतर शुभमन गिलही बाद झाला. याआधी, शुभमन गिल पहिल्या डावातही संघर्ष करताना दिसला होता. त्याने 66 चेंडूत 23 धावा केल्या होत्या.

शुबमन गिल दीर्घकाळापासून कसोटी फॉर्मेटमध्ये खराब फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे त्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी तो कसोटीत सलामीला येत होता. पण रोहित शर्मासोबत आता यशस्वी जैस्वाल सलामी करतो. तर गिलला क्रमांक-3ची जबाबदारी देण्यात आले. पण त्याला त्याची जबाबदारी अद्याप नीटपणे सांभाळता आलेली नाही.

शुबमन गिलच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, तिसऱ्या क्रमांकावर तो खेळायला आल्यापासून त्याचा फॉर्म खराब झाला आहे. शुभमन गिल 12 जुलै 2023 रोजी पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यानंतर गिलने केवळ 47, 6, 10, 29*, 2, 26, 36, 10, 23, 0 धावा केल्या आहेत. शुभमन गिलच्या बॅटमधून कसोटीतील शेवटची मोठी खेळी मार्च 2023 मध्ये आली होती, जेव्हा त्याने अहमदाबादमध्ये 128 धावा केल्या होत्या.

आता आगामी सामन्यात टीम इंडिया शुभमन गिलला संधी देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कसोटी फॉरमॅटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे खूप कठीण आहे. या क्रमांकावर भारतासाठी मोठ्या दिग्गज खेळाडूंनी फलंदाजी केली आहेत. राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजाराचा वारसा पुढे नेणे शुभमन गिलसाठी इतके सोपे नसेल. गिलला कसोटीतून वगळण्याची वेळ आली आहे, असे लोक ट्विटरवर म्हणू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT