Shubman Gill  File Photo
क्रीडा

गिलला गंभीर दुखापत; इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार?

मालिकेला अद्याप एक महिन्याचा अवधी आहे. पण त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे तो कसोटी मालिकेत खेळू शकेल, असे वाटत नाही.

सुशांत जाधव

भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल दुखापतग्रस्त झाल्याचे समोर येत आहे. या दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्याला त्याला मुकावे लागू शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला इंग्लंड विरुद्ध मोठे चॅलेंज असेल. या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. शुबमन गिलच्या जागी अभिमन्यू मिथुन याला मुख्य टीममध्ये स्टँड बाय खेळाडू म्हणून सहभागी करुन घेण्यात येऊ शकते. (Shubman Gill has sustained a leg injury that makes him a doubt for Indias first Test vs England)

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटींवर दिलेल्या माहितीनुसार, शुबमन गिल इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतूनच बाहेर निघू शकतो. मालिकेला अद्याप एक महिन्याचा अवधी आहे. पण त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे तो कसोटी मालिकेत खेळू शकेल, असे वाटत नाही. त्याला यातून सावरायला खूप वेळ लागू शकतो, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. शुबमन गिलने दुखापतीमुळे आगामी कसोटी मालिकेतून माघार घेतली तरी भारतीय संघाकडे मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुलच्या रुपात अन्य पर्याय उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT