Shubman Gill May Left Gujarat Titans Rumors  esakal
क्रीडा

Shubman Gill : शुभमन गिल देणार गुजरात टायटन्सला सोडचिठ्ठी; CSK शी नवा घरोबा?

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill Gujarat Titans : गुजरात टायटन्सने 2022 च्या पदार्पणाच्याच हंगामात विजेतेपदाला गवसणी घातली होती. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल या नव्या संघाचा एक अविभाज्य भाग होता. त्याने अंतिम सामन्यात देखील महत्वपूर्ण खेळी केली होती. मात्र सध्या गुजरात टायटन्स आणि शुभमन गिल यांच्यात झालेल्या ट्विटवरील संवादावरून गिल गुजरात टायटन्स सोडणार का अशी शंका निर्माण झाली आहे.

गुजरात टायटन्सने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'हा प्रवास कायम लक्षात राहील. शुभमन गिल तुला पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा.' असे ट्विट केले. याला शुभमन गिलने देखील ह्रदयाचा आणि मिठी मारल्याचा इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली.

या संपूर्ण घडामोडींवर एका नेटकऱ्याने हे काय चाललं आहे अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या एका युजरने 'उथप्पाने सीएसकेमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तिथे एक पोकळी निर्माण झाली आहे. तसेच गुजरात टायटन्स रविंद्र जडेजाची IPL 2023 ची होम फ्रेंचायजी असू शकते. आपण मोठ्या बदलांकडे चाललो आहोत का?' असा प्रश्न विचारला.

काही नेटकरी हा एक सोशल मीडिया प्रँक असल्याचे बोलत आहेत. आता हे सर्व सांगणार की आमचे अकाऊंट हॅक झाले होते.' तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ही जाहिरात असल्याचे सांगितले. शुभमन गिलने आपल्या आयपीएल कारकिर्दिची सुरूवात कोलकाता नाईट रायडर्सकडून केली होती. त्यानंतर गुजरातने लिलावापूर्वी गिलला विकत घेतले. त्याने गेल्या हंगामात 16 सामन्यात 483 धावा केल्या आहेत. त्याने 132.33 च्या स्ट्राईकने धावा केल्या. यात त्याच्या टी 20 कारकिर्दितील सर्वोकृष्ट 96 धावांच्या खेळीचा देखील समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT