क्रीडा

Wi vs Ind: टीम इंडियाचा डाव स्वत:वर उलटला! तिसऱ्या क्रमांकावर गिल फेल, आता कोण आहे दावेदार?

Kiran Mahanavar

Wi vs Ind 2nd Tset : भारतीय कसोटी संघातून चेतेश्वर पुजाराचे पत्ता कट झाला आहे. यानंतर शुबमन गिलला भारतीय कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत शुभमन गिलला पहिल्या कसोटी सामन्यात केवळ 6 धावा आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 धावा करू बाद झाला.

गेल्या 4 कसोटी डावांमध्ये शुभमन गिलच्या बॅटमधून 13, 18, 6 आणि 10 धावा झाल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्‍ये नंबर-3 बॅटिंग पोझिशन सर्वात महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन काही खेळाडूना नंबर-3 फलंदाजीसाठी तयार करू शकते.

बीसीसीआयला टीम इंडियात नंबर-3 बॅटिंग पोझिशनवर कोणात्या खेळाडूला संधी द्यायचे हे ठरवणे काही अवघड नाही. उलट संघाकडे क्रमांक 3 साठी एका पेक्षा एक चांगले फलंदाज आहेत. ज्यामध्ये ऋतुराज गायकवाडसह सूर्यकुमार यादव, केएल राहुल यांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव हा उत्तम फॉर्म असलेला खेळाडू आहे. जो मैदानावर कोणत्याही बाजूने शॉट्स खेळू शकतो.

केएल राहुल हा खेळाडू तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. तो पण या पोझिशनवर खेळू शकतो. याशिवाय ऋतुराज गायकवाडलाही तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली तर तो गिलपेक्षा सरस धावा करताना दिसेल. त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संघाला पुजाराची जागा लवकरच भरावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

Latest Marathi News Live Update : ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड; बड्या व्यक्तींवर कारवाईची शक्यता?

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT