Shubman Gill Posts Cryptic Tweet About Controversial Catch 
क्रीडा

Shubman Gill Catch Controversy: भारतावर अन्याय? वादग्रस्त झेलवर शुभमन गिलची प्रतिक्रिया, ICCचा नियम काय सांगतो

गिलच्या बाद झाल्याने रोहितही आश्चर्यचकित; शुभमन गिलने दिले पुरावे

Kiran Mahanavar

Shubman Gill Catch Controversy : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दुसऱ्या डावात वादग्रस्तरित्या बाद झाला. या कॅचवर युवा सलामीवीराने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे ज्यात कॅमेरून ग्रीन कॅच पकडताना दिसत आहे.

तसेच त्याने इमोजीमध्ये लेन्सचा वापर केला आहे. दुसर्‍या इमोजीमध्ये एक व्यक्ती डोकं आपटत आहे. भारताला 444 धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर शुभमन गिल आणि रोहित शर्मा चांगली फलंदाजी करत होते.

चहापानाच्या अगोदरच्या शेवटच्या षटकात स्कॉट बोलंडच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. स्लिपमध्ये ग्रीनने बॉल पकडण्याचा जिवापाड प्रयत्न केला, पण ड्राईव्ह मारल्यानंतर तो जमिनीवर पडला तेव्हा बॉल जमिनीला स्पर्श झाल्यासारखे दिसले. थर्ड अंपायरच्या या वादग्रस्त निर्णयानंतर ओव्हलवर भारतीय चाहत्यांना ऑस्ट्रेलियन संघ आणि ग्रीन यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. स्टेडियममध्ये चीट,चीट अशा घोषणा देण्यात आल्या.

कॅचबद्दल आयसीसीचा नियम काय सांगतो

  • चेंडू जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी क्षेत्ररक्षकाने अचूक पकडला तर तो झेलबाद झाला असे मानले जाते.

  • जर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात असेल आणि हात जमिनीला स्पर्श करत असेल, तर फलंदाज बाद होईल.

  • झेल घेताना हात जमिनीला लागला तरी चेंडू त्याला स्पर्श करू नये.

  • सॉफ्ट सिग्नलच्या नियमानुसार, जेव्हा एखादा झेल संशयास्पद होता, तेव्हा मैदानी पंच आपला निर्णय द्यायचे, त्यानंतर प्रकरण तिसऱ्या पंचाकडे पाठवले जायचे. अशावेळी संशयित झेलवर निर्णय घेताना तिसऱ्या पंचानेही कन्फ्यूज झाले, तर मैदानी पंचांच्या निर्णयावर ठाम राहायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

ICC Womens World Cup 2025 : स्पर्धेत राहण्यासाठी टीम इंडिया स्ट्रॅटेजी बदलणार? दोन पराभवानंतर हरमनप्रीत कौरला कठोर निर्णय घ्यावेच लागणार...

Latest Marathi News Live Update : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुली

Solapur News: 'शेतकऱ्यांचा माजी गृहराज्यमंत्र्यांच्या दारात टाहो'; दोन वर्षांपासून पाच कोटींची रक्कम थकवली, साेलापुरात बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT