shubman gill and sara tendulkar  
क्रीडा

WTC Final नंतर शुभमन अन् सारा व्हॅकेशनवर; दोघं फिरतायत तरी कुठं?

Kiran Mahanavar

shubman gill and sara tendulkar : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे दु:ख विसरण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करत आहेत. या अंतिम सामन्यात शुभमन गिल विशेष काही करू शकला नाही.

वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी गिल आता पूर्णपणे ब्रेकवर आहे. फक्त गिलच नाही तर सचिन तेंडुलकरची लाडकी मुलगी सारा देखील सध्या भारताबाहेर सुट्टी एन्जॉय करत आहे. हे दोघे बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत असल्याच्या बातम्या येत आहेत.

शुभमन गिलचे नाव गेल्या अनेक वर्षांपासून सारा तेंडुलकरसोबत जोडले जात आहे. आयपीएलदरम्यानही चाहत्यांच्या नजरा या दोघांवर होत्या. आता गिलला क्रिकेटमधून ब्रेक मिळाल्यामुळे तो सारा तेंडुलकरसोबत नाही तर ईशान किशनसोबत सुट्टीवर गेला आहे.

सारा तेंडुलकर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपदरम्यान लंडनमध्ये होती. येथून ती आपल्या कुटुंबासह केनियाला गेली. सारा मसाई मारा नॅशनल पार्कमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तिने तिचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी एक निवडू शकले नाही.'

गिल इशान किशनसोबत फिरायला गेला आहे. गिलने त्याचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो प्रवास करताना दिसत आहे. गिल आणि सारा वेगवेगळे असू शकतात परंतु चाहते कमेंट बॉक्समध्ये एकमेकांचे नाव घेऊन दोघांना चिडवण्याची एकही संधी सोडत नाहीत.

नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर शुभमन गिलला मोठा दंड ठोठावण्यात आला होता. पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर आऊट देण्याच्या निर्णयावर टीका केल्याबद्दल शुभमन गिलला अतिरिक्त 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. शुभमन गिलने ट्विट करून पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT