shubman gill sister shahneel gill comment on KKR Star Rinku Singh Flaunts Six Pack Abs On Maldives Vacation  
क्रीडा

Rinku Singh : 'व्यसन लागु शकते...' Shirtless रिंकू सिंहच्या फोटोवर गिलची बहिण फिदा

शर्टलेस रिंकूवर गिलची बहिण फिदा

धनश्री ओतारी

शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 5 षटकार लगावत कोलकाता नाईट रायडर्सला रोमहर्षक विजय मिळवून दिल्यानंतर रातोरात स्टार झालेला रिंकू सिंह सध्या चर्चेत आला आहे. रिंकू सिंहचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशातच भारताचा सलामीवीर शुभमन गिलची बहिणदेखील चर्चेत आली आहे. शर्टलेस रिंकूवर गिलची बहिण फिदा झाली आहे.

अवघ्या 50 लाख रुपयांच्या प्राइजला कोलकात्याने संघात सहभागी करुन घेतलेला रिंका गुजरात जायटन्सविरुद्धच्या या तुफान खेळीमुळे रातोरात स्टार झाला होता. सध्या रिंकू मालदीवमध्ये सुट्ट्यां एन्जॉय करताना दिसत आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. (Latest Sport News)

धडाकेबाज फलंदाजीमुळे चर्चेत आलेला रिंकू आता त्याच्या शर्टलेस फोटोमुळं चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे गिलच्या बहिणीच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(Latest Sport News)

या फोटोंमध्ये रिंकूचे सिक्स पॅक अॅब्स दिसत आहेत. रिंकूचा हा लूक पाहून चाहते कमेंट्चा वर्षावर करत आहेत. रिंकूच्या या शर्टलेस फोटोंवर शुभमन गिलची बहीण शहनीलनेही कमेंट केली आहे. रिंकूचा हा हॉट लूक पाहून शहनीलने त्याचं कौतुक केलं आहे. (Latest Sport News)

रिंकूने या फोटोंना "सावधान पुढील कंटेटचं तुम्हाला व्यसन लागू शकतं," अशी मजेदार कॅप्शन दिली आहे. तर, गिलची बहिण शहनील 'ओ हीरो' अशी कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटमुळं सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ही कमेंट पाहून अनेकांना शहनीलच्या रिंकूच्या प्रेमात पडली की काय असा प्रश्न पडला आहे. शहनील ही स्वत: एक मॉडेल असून ती इन्स्ताग्रामवर प्रचंड सक्रीय आहे. अनेक खेळाडूंच्या पोस्टवर ती कमेंट्स करत असते. तिला फॉलोअर्सही हजारोंच्या संख्येनं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT