shubman gill started batting practice in ahmedabad cricket ind vs pak world cup clash Sakal
क्रीडा

IND vs PAK : अहमदाबादचे ‘रण’ तापू लागले; भारतीय क्रिकेट संघ दाखल; शुभमन गिलकडूनही सराव सुरू

येत्या शनिवारी होणाऱ्या भारत-पाक सामन्याची प्रतीक्षा क्रिकेट विश्वाला लागून राहिली आहे

शैलेश नागवेकर

अहमदाबाद : कोणतीही विश्वकरंडक स्पर्धा असो, भारत-पाक सामना एकीकडे आणि इतर सामने दुसरीकडे असे वास्तव नेहमीच पाहायला मिळते. ही एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा भारतात होत असताना या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भारत-पाक सामन्याच्या उत्सुकतेने शिखर गाठले आहे. सूर्य चांगलाच तळपू लागलेला असताना अहमदाबादचे क्रिकेट रणही आता तापू लागले आहे.

येत्या शनिवारी होणाऱ्या भारत-पाक सामन्याची प्रतीक्षा क्रिकेट विश्वाला लागून राहिली आहे. पाकचा संघ कालच येथे दाखल झाला; तर अफगाणिस्तानविरुद्धची मोहीम फत्ते करून भारतीय संघ आज दुपारी अहमदाबादमध्ये आला. त्यामुळे या क्रिकेट युद्धासाठी आता नरेंद्र मोदी स्टेडियमचे रणांगण तयार झाले आहे.

भारत - पाकिस्तान यांच्यामधील लढत पाहण्यासाठी दिग्गजांचीही उपस्थिती असणार आहे. बीसीसीआयकडून विशेष पाहुण्यांना गोल्डन तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत व सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे.

तसेच या लढतीआधी बॉलीवूडमधील स्टार्सकडून एका विशेष शोचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी १२.४० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून दुपारी १.१० वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरु राहणार आहे. याप्रसंगी संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

गर्दी वाढू लागली

या भारत-पाक सामन्याची प्रतीक्षा अनेक महिन्यांपासून सर्वांनाच लागून राहिली होती. अगोदरच्या १५ ऑक्टोबर ही तारीख नियोजित होती त्यामुळे अनेकांनी ४०-५० हजार रुपये मोजून हॉटेलच्या रूम आरक्षित केली होती; परंतु सामना एक दिवस अगोदर झाल्यामुळे गणिते बिघडली; तरीही या सामन्याला येण्याचा हट्ट कायम राहिला.

मिळेल त्या किमतीत हॉटेल्स केव्हाच आरक्षित झाली आहेत. ज्यांचे नातेवाईक अहमदाबाद आणि अजूबाजूच्या परिसरात राहतात ते गुरुवारपासूनच येथे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरची गर्दी वाढली आहे. उद्या आणि शनिवारी अहमदाबादमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर ट्रॅफिक जाम असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रचंड उकाडा

ऑक्टोबर हीटचा तडाखा अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गुरुवारी दुपारी ३५ अंश सेल्सियलपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. शनिवारीही त्यात फरक नसणार. अशा तापलेल्या वातावरणात हा हायव्होल्टेज सामना खेळताना खेळाडूंची आणि लाखापेक्षा अधिक संख्येने उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांच्या क्षमतेची कसोटी लागणार आहे.

शुभमन गिलकडून दुपारच्या सत्रात सराव

डेंगीच्या आजारातून बरा झालेल्या शुभमन गिलने आज प्रथमच दुपारच्या सत्रात जवळपास एक तास नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. डेंगीच्या आजारात थकवा येत असतो. त्यामुळे नेटमधील सरावानंतर गिल कसा प्रतिसाद देतो, यावर तो पाकविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, हे ठरवण्यात येईल. अजून दोन दिवस असल्याने त्याला पूर्ण तंदुरुस्तीसाठी वेळ आहे आहे, संघ व्यवस्थापनाच्या सूत्रांनी सांगितले.

सुरक्षारक्षकांकडून ताबा

पाक संघानंतर आता भारतीय संघही दाखल झाल्यामुळे सुरक्षारक्षकांनी स्टेडियमचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. सामन्याच्या वेळी कशी सुरक्षा व्यवस्था करायची, याची रंगीत तालिम होत आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्याला लाखभरापेक्षा अधिक गर्दी झाली होती. तो अनुभव असला, तरी भारत-पाक सामन्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे काटेकोर सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

Minister Nitin Gadkari: पाणी व्यवस्थापनाने शेतकरी ऊर्जादाता: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; नाम फाउंडेशन दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

Arvind Kejriwal: पाकसोबत क्रिकेट खेळणे गद्दारी: आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींवरही टीका

SCROLL FOR NEXT