Shubman Gill ICC ESAKAL
क्रीडा

Shubman Gill : डेंग्यूमधून सावरत असलेल्या गिलला आयसीसीनं दिलं मोठं गिफ्ट

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill : भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिल गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूने आजारी आहे. त्यामुळे तो वर्ल्डकपचे पहिले दोन सामने देखील मुकला. मात्र आजारपणातून सावरत नेटमध्ये परतलेल्या गिलला आता आयसीसीने मोठं गिफ्ट दिलं.

शुभमन गिलला सप्टेंबर महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाला आहे. याची घोषणा आयसीसीने आज केली. सप्टेंबर महिन्यात गिलने वनडे क्रिकेटमध्ये 80 च्या सरासरीने 480 धावा ठोकल्या. गिलने मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मलानला मागं टाकत प्लेअर ऑफद मंथचा पुरस्कार पटकावला.

गिलने आशिया कपमध्ये 75.5 च्या सरासरीने 302 धावा ठोकल्या. त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत त्याने दोन सामन्यात 178 धावा केल्या. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात 104 धावांची शतकी खेळी केली. त्यापूर्वी सप्टेंबर महिन्यातच त्याने आशिया कपमध्ये बांगलादेशविरूद्ध 121 धावांची शतकी खेळी केली होती.

याचबरोबर गिलने सप्टेंबर महिन्यात तीन अर्धशतके ठोकली. त्यामुळे त्याची प्लेअर ऑफ द मंथची दावेदारी प्रबळ झाली. तो सप्टेंबर महिन्यात खेळलेल्या 8 डावात फक्त 2 वेळात अर्धशतक न करताच बाद झाला होता. गिल हा सध्या आयसीसी बॅटिंग रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 35 सामन्यात 66.1 च्या सरासरीने 1917 धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट 102.84 इतके आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT