Sikandar Raza  
क्रीडा

Sikandar Raza : वर्ल्डकपच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सिकंदर रझा ड्रेसिंग रूममध्ये ढसाढसा रडला

Kiran Mahanavar

World Cup Qualifiers Sikandar Raza Viral : विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यात स्कॉटलंडने झिम्बाब्वेचा पराभव केला. या सामन्यात यजमान झिम्बाब्वेला 31 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर स्कॉटलंडविरुद्धच्या पराभवानंतर झिम्बाब्वेचे विश्वचषक 2023 साठी खेळण्याचे स्वप्न भंगले.

मात्र, झिम्बाब्वेच्या पराभवानंतर एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा वर्ल्ड कपच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर ड्रेसिंग रूममधील हा फोटो आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो...

सिकंदर रझाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. वास्तविक, या संपूर्ण स्पर्धेत सिकंदर रझाने नेत्रदीपक कामगिरी केली. फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही त्याने आपले पराक्रम दाखवले.

मात्र झिम्बाब्वेचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. त्याचवेळी स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात सिकंदर रझाने 40 चेंडूत 34 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला. मात्र यजमान संघाला विजय मिळवता आला नाही.

या सामन्याबाबत बोलायचे झाले तर, झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 235 धावांचे लक्ष्य होते, मात्र शॉन विल्यम्सचा संघ 41.1 षटकात केवळ 203 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे स्कॉटलंडने झिम्बाब्वेचा 31 धावांनी पराभव केला.

नाणेफेक हारल्यानंतर स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 234 धावा केल्या. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक 48 धावा केल्या. याशिवाय मॅथ्यू क्रॉस आणि ब्रेंडन मॅक्युलम यांनी अनुक्रमे 38 आणि 43 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT