New Zealand Eden Carson  SAKAL
क्रीडा

NZ vs SL ODI : मैदानातील अंपायर झोपेत! ODI सामन्यात गोलंदाजाने टाकली 11 षटके, अन्...

Kiran Mahanavar

NZ vs SL 2nd ODI : क्रिकेटच्या खेळात मैदानावर अंपायरची भूमिका मोठी असते. अनेक सामन्यांचे निकालही पंचांच्या निर्णयाने उलटले आहेत. मात्र श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघादरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात पंचांच्या चुकीमुळे असा अनोखा विक्रम रचला गेला आहे, जो वनडेच्या इतिहासात आजपर्यंत आधी घडली नाही.

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात किवी गोलंदाज ईडन कार्सनने 11 षटकांचा स्पेल टाकला. मॅचचे 45 वे ओव्हर टाकताच कार्सनने त्याच्या स्पेलचे 10 ओव्हर्स पूर्ण केले होते. मात्र पंचांच्या चुकीमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजाने डावातील 47 वे आणि त्याचे 11 वे षटक टाकले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच गोलंदाजाने 11 षटकांचा स्पेल टाकला आहे.

इडन कार्सनने शानदार गोलंदाजी करत 11 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 41 धावा दिल्या आणि श्रीलंकेच्या दोन मोठ्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कार्सनने त्याच्या 11व्या षटकात पाच चेंडूंचा डॉट टाकला आणि फक्त एक धाव खर्च केला.

न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 329 धावा केल्या. सोफिया डेव्हाईन आणि अमिला केर यांनी संघाकडून शतकी खेळी खेळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 229 धावांची विक्रमी भागीदारी केली, जी श्रीलंकेविरुद्ध वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी आहे. अमिला केरने 108 धावा केल्या, तर डेव्हाईनने 121 चेंडूत 137 धावा केल्या. 330 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 218 धावांवर सर्वबाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT