smriti mandhana first indian women cricketer  esakal
क्रीडा

Smriti Mandhana आता विराटच्या क्लबमध्ये सामील

स्मृती मानधनाच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला.

धनश्री ओतारी

स्मृती मानधनाच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला. भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला ८ विकेट्सनी धुळ चारली. धावांचा पाठलाग करताना मंधानाने तिच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक झळकावले. आणि ती विराट कोहलीच्या क्लबमध्ये सामील झाली.(Smriti Mandhana becomes first indian women cricketer to have completed 1000 runs)

मंधनाने तिच्या टी 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 15 वे अर्धशतक झळकावले. ती 42 चेंडूत 63 धावा करून नाबाद राहिली. म्हणजेच 150 च्या स्ट्राईक रेटने तिने ह्या धावा कुटल्या. या खेळीत तिने 8 चौकार आणि ३ षटकार मारले. ही कामगिरी करताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने 40 डावात 32 च्या सरासरीने 1 हजार 59 धावा केल्या आहेत. यात 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे लक्ष्याचा पाठलाग करताना T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावा करू शकले आहेत. म्हणजेच मंधना आता कोहली आणि रोहितच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. कोहलीने 40 डावात 1789 धावा केल्या असून रोहितने 57 डावात 1375 धावा केल्या आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव करत आपला पहिला विजय साजरा केला. भारताने पाकिस्तानचे 100 धावांचे माफक आव्हान 12 व्या षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून स्मृती मानधनाने 42 चेंडूत नाबाद 63 धावांची आक्रमक खेळी केली. तर गोलंदाजीत स्नेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT