Smriti Mandhana Harmanpreet Kaur Shine India Women Cricket Team Defeat Sri Lanka Women Cricket Team In 2nd T20I  esakal
क्रीडा

SLW vs INDW : स्मृती - हरमनप्रीतची दमदार खेळी; भारताची मालिकेत विजयी आघाडी

अनिरुद्ध संकपाळ

दांबुला : श्रीलंकन महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यात ठेवलेले 126 धावांचे आव्हान भारताने 19.1 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. भारताने दुसरा टी 20 सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 2 - ० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने 39 तर हरमनप्रीत कौरने नाबाद31 धावा केल्या. (Smriti Mandhana Harmanpreet Kaur Shine India Women Cricket Team Defeat Sri Lanka Women Cricket Team In 2nd T20I)

लंकेचे 126 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला 30 धावांवर पहिला धक्का बसला. सलामीवीर शेफाली वर्मा10 चेंडूत 17 धावा करून बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि सभिनेनी मेघना यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला मात्र सुगंदिका कुमारीने मेघनाला 17 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर स्मृतीने हरमनप्रीत कौरबरोबर भागीदारी रचत संघाला 86 धावांपर्यंत पोहचवले.

मात्र स्मृती मानधना आपल्या अर्धशतकाजवळ पोहचत असताना रनवीराने तिला 39 धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार कौरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत संघाला विजयापर्यंत पोहचवले. तिने 30 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. तिला यस्तिका भाटियाने 13 धावांची तर दिप्ती शर्माने 5 आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 3 धावांची साथ दिली. श्रीलंकेकडून रणसिंगे आणि रनवीरा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने भारतासमोर 126 धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रीलंकेकडून सलामीवीर विशमी गुणरत्ने आणि चामरी आटापटू यांना 87 धावांची सलामी दिली. या दोघींनी भारतीय गोलंदाजांना 14 व्या षटकापर्यंत एकही यश मिळू दिले नाही. गुणरत्नेने 50 चेंडूत 45 धावांची तर आटापटूने 41 चेंडूत 43 धावांची खेळी केली.

मात्र पूजा वस्त्राकरने आटापटूला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर हरमनप्रीत कौरने गुणरत्नेला 45 धावांवर बाद करत दोन्ही सेट झालेले फलंदाज माघारी धाडले. यानंतर भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मिळवण्यास सुरूवात केली. 17 षटकात 2 बाद 106 धावा करणाऱ्या श्रीलंकेची अवस्था भारताने 20 षटकात 7 बाद 125 अशी केली. आटापटू आणि गुणरत्ने बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर रेणुका सिंह, राधा यादव, पूजा वस्त्राकर आणि हरमनप्रीत कौरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT